महागाईवर संताप; मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध
अमरावती : केंद्रातील मोदी सरकारच्या जनहित विरोधी धोरणामुळे काही दिवसांपासून पेट्राेल व डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या जनहित विरोधी धोरणाचा सोमवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे १४ तालुक्यात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. परिणामी सामान्य माणसाचे व गरीबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतकरीसुद्धा मेटाकुटीस आले आहे. प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली असून, महागाईला जनता कंटाळलेली आहे. अशा या दळभद्री मोदी सरकारविरुद्ध प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपावर काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन जिल्हाभर करण्यात आले. यामध्ये सर्व काँग्रेस पदाधिकारी तालुका, शहर अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग दर्शविला. अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्वतः अचलपूर विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपावर जाऊन निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनात अचलपूरचे तालुकाध्यक्ष श्रीधर काळे, श्रीकांत झोडपे शहराध्यक्ष, पप्पू शेठ चंदानी, हरिशंकर अग्रवाल, साजिद फुलारी, डी.पी. राऊत, मधुकर हूड, विलास उदापूरकर, कैलास आवारे, अमोल बोरेकर, अजित खान, इक्बाल पटेल, अन्सार भाई, प्रमोद कांबळे, नामदेव तनपुरे, मोहम्मद अकबर, सुनील तायडे, गजानन टापरे, देवेंद्र ठाकरे, नरेंद्र येऊतकर, विजय मडगे, अमोल चिमोटे, शैलेश म्हाला, राहुल सालफळे, राहुल घाटे, अजित खान, सचिन काळे, सुरेंद्र वानखडे, कैलास कडू, रफिक, राजीक आबिद खान, सागर व्यास, शुभम गायकवाड, सुरेश राव खैरे, बंडू हरणे, रवींद्र खवले, प्रवीण हिरुळकर, आबा पाटील, अमोल ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे, अखिल युनूस खा, धीरज पवार, बाळा शिरसोदे, राहुल अपाले, धर्मवीर वानखडे, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
हे कसले अच्छेदिन?
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस दर प्रचंड वाढविले आहे. पेट्रोलने शंभरी पार केली, तर डिझेलचे दर शंभराच्या जवळजवळ जात आहे. स्वयंपाकाचा गॅस हजार रुपयांजवळ पोहोचत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. अच्छे दिन करता करता प्रत्यक्ष बुरे दिन जनतेवर मोदी सरकारने लादल्याची टीका आंदोलनात जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली.