अमरावती : जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल,रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १४ वाजेपर्यत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांनाही परवानगी आहे. मात्र धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स बंदच राहणार आहेत. ४ एप्रिलपासून लागू झालेल्या निर्बंधामुळे त्या व्यावसायिकांना १३३ दिवसानंतर आता पूर्णवेळ व्यवसायाची परवानगी मिळाल्याने स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
१५ ऑगस्टपासून संपूर्ण सप्ताहभर रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा पवनीत कौर यांनी १३ ऑगस्ट रोजी निर्णय जारी केला आहे.
बाॅक्स
हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी ५० टक्के क्षमता
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स सप्ताहातील सातही दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येईल. सोबतच हॉटेल रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालये, आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असून लसीकरण सक्तीचे केले आहे. कमी उपस्थितीत आणि वेगवेगळया शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकतील.
बॉक्स
हे राहणार सुरू
सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू.
हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी,
शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश
मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेत जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत परवानगी
खुल्या लाॅनमधील क्षमतेच्या ५० टक्के म्हणजे लग्न सोहळ्यासाठी २०० लोकांना मुभा
खासगी कार्यालये आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार
बॅडमिटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी
जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
बॉक्स
विवाह सोहळ्यासाठी मर्यादा वाढविली
मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्याला २०० जणांच्याच उपस्थितीस पवानगी दिली आहे.
बॉक्स
यांना परवानगी नाही
धार्मिकस्थळे, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स सुरू करण्यास अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ते बंदच राहणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी निर्देश देण्यात आले आहेत. सामाजिक अंतर न पाळल्यास दुकान, प्रतिष्ठाने, आस्थापनास ३५ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई, मंगल कार्यालयत, लग्न समारंभात नियम डावलल्यास ५६० हजार रूपये दंड व फौजदारी कारवाई, विनामास्क फिरणे, गर्दी करणे,उघडयावर थु्ंकताना आढळल्यास ७५० रुपयांचा दंड व फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.