शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिले मातेला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:12 PM

दुसºया बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने प्राणाशी गाठ आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसी युनिटने जीवदान देण्यासोबतच तिच्या तीन चिमुकल्यांवर मातृत्वाची सावली कायम ठेवली.

ठळक मुद्देडॉक्टरांची तत्परता : सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर विश्वास दृढ

धीरेंद्र चाकोलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुसºया बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने प्राणाशी गाठ आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसी युनिटने जीवदान देण्यासोबतच तिच्या तीन चिमुकल्यांवर मातृत्वाची सावली कायम ठेवली. त्यामुळे सामान्यजनांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास दृढ झाला.शहरातील विलासनगर येथील रोशनी पंकज सूर्यवंशी (२५) असे या महिलेचे नाव आहे. तिचा पती पंकज सूर्यवंशी यांचा याच परिसरात वेल्डिंगचा व्यवसाय आहे. या दाम्पत्याला अडीच वर्षांची जुळी मुले आहेत. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिचे सिझेरियन करावे लागले. तिला बुधवार, १८ आॅक्टोबर रोजी दुसºया बाळंतपणासाठी गर्भ साडेआठ महिन्यांचाच असताना जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवतीची अवघडलेली स्थिती पाहून तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी तिचे सिझेरियन करण्याचे ठरविले. प्रसूतीदरम्यान गर्भाशयाला प्लासेंटा अ‍ॅक्रेटा चिकटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पुढील धोका टाळण्यासाठी हिस्टेरेक्टरी इमर्जंसी अर्थात गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. संध्या खराते व त्यांचे सहायक डॉ. परमार यांनी केली. यादरम्यान रक्तचाप कमी होत नसल्याचे पाहून रोशनीला इर्विन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी प्रीती मोरे यांच्याशी संपर्क करण्यात आला.रोशनीला रक्तपुरवठा सुरू असल्याच्या अवस्थेतच सायंकाळी ५ वाजता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर आवश्यक रक्तपुरवठा करण्यात आला तसेच रक्तचाप सामान्य पातळीवर आणण्यासाठी उपचार करण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ काळपांडे, डॉ. पचगाडे यांनी हे उपचार केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोरे यांच्या नेतृत्वातील आयसीयू स्टाफने मोर्चा सांभाळला. अत्यंत नाजूक स्थितीतून रोशनीला काढल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर आहे.बाळ नागपूरला दाखलरोशनीचे सिझेरियन करण्यात आले. तिने मुलीला जन्म दिला. प्रकृती नाजूक असल्याने तिला नागपूरच्या जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.सामान्य माणसे शासकीय रुग्णसेवेबाबत नाके मुरडतात. मात्र, आमची सेवा उत्कृष्ट असल्याचे रोशनीच्या प्रकरणातून आम्ही दाखवून दिले आहे.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक