आॅनलाईन लोकमतअमरावती: श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्यावतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सन्मान महामोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करीत शिवप्रतिष्ठानने अपरजिल्हाधिकारी के.आर परदेशी यांच्यामार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनाव्दारे लक्ष वेधले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार केलेल्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मोर्चात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे जिल्हा कार्यवाहक महेश लढके, नीलेश टवलारे, मानव बुध्ददेव, अतुल बोंड, सुधीर बोपुलवार, शिवकुमार छांगानी, दीपक आदी सहभागी झाले होते.काय आहेत मागण्या?संभाजी भिडेंवरील तथाकथित खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी, पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावीे, कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यूृमुखी पडलेल्या राहूल फटांगळेला न्याय मिळावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:38 PM