अमरावती : जिल्ह्यात सोयाबिन पिकांचे पुर्नसर्वेक्ष़ण करूण ५० पैशाच्या आत आणेवारी लावून सरसकट शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यासह इतर मागण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.सलग तीन वर्षापासून नापिकी व दुष्काळामुळे विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिन पिकांचेही यंदा मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्याने खर्च केलेला पैसाही मिळू शकला नाही. उलट नापिकीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबिन पिकांचे पुर्नसर्वेक्ष़ण करूण ५० पैशाच्या आत आणेवारी लावून सरसकट शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुर्नगठण करूण ० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करूण देण्यात यावे,यासोबतच चांदुर बाजार, अचलपुर तालुक्यातील नादुरूस्त डीपीचे कामे त्वरित सुरू करावी, जळालेले टासन्फॉर्मर त्वरित बदलवून देण्यात यावे, नव्शयाने मंजूर डिपीचे कामे त्वरित सुरू करावे, विजवितरण कंपनीने इफ्रा टू ची कामे तातडीने सुरू करावीत अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलनाचा इशारा सुरेखा ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी सुभाष वैराळे, बाळासाहेब काळबांडे, तुळशीराम वैराळे, किशोर हिवसे, प्रमोद पाथरे, उध्दव दिवाण, ज्योती वैद्य, राजेश अढाऊ, संजय वानखडे, रमेश धवे, पांडूरंग वैराळे, विश्र्वास ढोले, अजिज खारू पठाण, अरूण पारिसे, दिपक भोजने, राजकुमार वैराळे, दादाराव पारिसे, कदीर खॉ पठाण, पुरूषोत्तम वैराळे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा क चेरीवर धडक
By admin | Published: November 19, 2015 12:51 AM