लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.राज्य शासनाने विशेष आदेशाने शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला या गंभीर आजाराची लस प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी विशेष पालकसभेचे आयोजन केले होते. पालकांबाबत या लसी योजनेची जागृती व्हावी, यासाठी सर्व पालकांना आमंत्रित केले होते. आरोग्य विषयाबाबतीत ४० मिनिटांचा विषय संपताच पालकांनी जि. प. शाळेतील गंभीर तक्रारींचा पाढाच वाचला. यावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा जि. प. चे प्राचार्य इंगळे यांनी सर्व पालकांनी एका एकानी प्रश्न व नाव सांगावे, गोंधळ करू नये, असे बजावताच प्रत्येक पालकांनी गंभीर विषयाला घात घातला. मोहोड, पांडूरंग डोंगरे, सारिका यादव, मुकुंदराव यादव, चेतना तायडे यांनी विविध विषयाची सरबत्ती केली. यात ९ वी, १० वीचा गणित विषयाचा दोन महिन्यांपासून पिरीयड होत नाही. १० वी, १२ वीला केमिस्ट्री, बॉयलॉजी, गणिताचे तीन शिक्षक नाही. वर्ग ६ ते ८ ला दोन शिक्षक नाही, असे पाच शिक्षक कमी असणे ही बाब गंभीर आहे. तसेच १० वी, १२ वीचे विज्ञानाचे प्रॅक्टीकल दोन महिन्यापासून बंद आहे. विशेष प्रवर्गाला विद्यार्थ्यांना अनुदान असता खुला वर्गातील विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याची सक्ती १० वी, १२ वी शिक्षण शिकविण्याचे बोर्ड डिजीटल नसल्याने साधे बोर्डावरचे शिक्षकाचे लेखी काम विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसत नाही. आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही. या मुद्यावरून पालकसभेत गदारोळ झाला. शाळा व्यवस्थापन समितीबाबत पुढील कार्यवाही केली किंवा नाही, असेही प्रश्न विचारण्यात आले. शाळेत शिक्षक गृहपाठ देत नाही. दिले तर त्याची तपासणी होत नाही, अशा विविध मुद्यांनी सभेत गरमागरमी होत होती. मनुष्यबळाचा अभाव व शाळेला तटरक्षक भिंत नसल्याने शाळेसमोर विविध समस्या आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्राचार्य इंगळे यांनी म्हणाले. सभेला १२३ पालक उपस्थित होते. त्यात ८२ महिला पालकांचा समावेश होता. महिला पालकांनीच प्रश्नांची सरबत्ती केली.शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नाहीजिल्हा परिषद शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याने वरिष्ठ अधिकारी असतानादेखील कोणताही अधिकारी शाळेला भेट देत नसल्याची चर्चा पालकात दिसून आली.
जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:29 PM
स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.
ठळक मुद्दे१० वी, १२ वीला शिक्षक नाही : दोन महिन्यांपासून स्थिती गंभीर, विद्यार्थी वाऱ्यावर, पालक आक्रमक