सोयाबीन तेलाचा वापर सर्वत्र फोडणीसाठी होतो. त्याला पर्याय आवडीनुसार फल्लीतेल, जवसाचा वापर काही धनदांडगे आजही करतात. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने ही महागाई कल्पनेच्या पलीकडे गेल्याने सामान्य जनतेची फरफट होताना दिसत आहे. काहींना अद्यापही रोजगार प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आर्थिक चणचणीत ही महागाई वाकडेपणा दाखवित असल्याने जगावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
बॉक्स
विदेशातून आयात अत्यल्प
ब्राझील, अर्जेंटिन या देशातून भारतात सोयाबीनची दरवर्षी आयात केली जाते. मात्र, यंदा तेथेच उत्पादन कमी झाल्याने जागेवरूनच भाव अधिक व वाहतूक खर्च वाढ डिझेलमुळे वाढल्याने सोयाबीन तेलाचे दर वाढले. त्यामुळे सोयाबीनच्या खालोखाल फल्लीतेलाचे भाव राहत असल्याने अनेकांनी फल्ली तेलाचा वापर सुरू केला तसेच काहींनी पामतेला खाण्यासाठी वापर चालविल्याने सर्व प्रकारच्या तेलाचे दर झपाट्याने वाढल्याची माहिती तेल भांडारचे संचालक श्रीकांत साहू यांनी दिली.
--
पामतेलाचा खाण्यासाठी सर्रास वापर
पामतेल हे इंडोनेसिया, मलेसिया येथून भारतात आयात होते. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने काही हॉटेल्समध्ये सर्रास पामतेलाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा होत असल्याने पामतेलाचे दर वाढत असल्याची प्रतिक्रिया तेल भांडारचे संचालक पवन गुप्ता यांनी दिली.
पोजपुजेसोबतच देवपूजाही महागली
जीवनावश्यक वस्तू असल्याने ती घरात आणावीच लागते. त्यामुळे मिळेत त्या दरात ती वस्तू घ्यावीच लागते. यासाठी दुकानदारांना दोष देता येणार नाही. सरकारने गोरगरिबांचा विचार करून आयात शुल्क कमी केल्यास फरक पडू शकतो.
- नितीन गोटे, ग्राहक
पोटपूजेसह देवाला दिवालाही दिवा लावावाच लागतो. त्यामुळे घरात शांती नांदते, ही शिकवण पूर्वजांची आहे. त्यामुळे दोन्ही खर्च भागविताना पर्याय म्हणून सोयाबीनऐवजी पामतेलचा वापर वाढत आहे. यातून आरोग्याला धोका असल्याचे माहीत असतानाही पामतेलाचा वापरण हा नाइलाज आहे.
- संजय रेचे, ग्राहक
तेलाचे दर (प्रती किलो)
सोयाबीन तेल - २०१९- ९५ रुपये २०२०मध्ये १२०, २०२१ मध्ये १६०
पामतेल २०१९ मध्ये ८४, २०२० मध्ये १०५ रुपये, २०२१ मध्ये १३५
फल्लीतेल २०१९ मध्ये ११०, २०२० मध्ये १३०, २०२१ मध्ये १७०
जवस तेल २०१९ मध्ये १४०, २०२० मध्ये १६०, २०२१ मध्ये २१०
२०२०