शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:46 AM

सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक : ५३७० हजारांपैकी ३७९१ जणांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ३,७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ७०.६० एवढी आहे.मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अपेक्षेपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांगांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदारांमध्ये विविध उपक्रम राबविले. याची जबाबदारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे सोपविली होती. यात स्वीप टीमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रभावी जनजागृती केली.निवडणूक विभागाने यावेळी दिव्यांगासाठी प्रशासनाला चोख नियोजनाचे निर्देश दिले होते. यामध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदार जागृतीवर भर दिला होता. घर ते मतदान केंद्र आणि मतदान केंद्र घरापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावर मदतीसाठी सहायकांची व्यवस्था तैनात होती. दिव्यांग मतदारांनीही प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच सहा विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेल्या ५ हजार ३७० दिव्यांग मतदारांपैकी ३ हजार ७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. दिव्यांग मतदारांची मतदानाची टक्केवारी ही ७०.६० टक्के एवढी आहे. यामुळे नियमित मतदारांच्या ६० टक्क््यांपेक्षा जास्त होते. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मतदानाचा गतवेळपेक्षा बºयापैकी वाढल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.असे झाले मतदानअमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर ग्रामीणमध्ये १०७० पैकी ६७२, नगर परिषद क्षेत्रात २३२ पैकी २६२, अंजगाव ग्रामीण ६४२ पैकी ४७४, तर नगपरपालिका क्षेत्रात १८३ पैकी १०८, धारणी ग्रामीण १९९ पैकी १३७, नगरपंचायत १० पैकी ६, चिखलदरा ७७ पैकी ५७, नगर परिषद ३ पैकी १, अचलपूर ग्रामीण १३७ पैकी १०८, नगर परिषद ६७ पैकी ३२, चांदूर बाजार ग्रामीण ३०१ पैकी २०१, नग परिषद ४२ पैकी ३६, तिवसा ग्रामीण ४३० पैकी २९१, नगपंचायत ७४ पैकी ६२, मोर्शी तालुक्यात २६ गावांमध्ये २४३ पैकी २०१, अमरावती ग्रामीण ३६४ पैकी २६९, शहर ५६६ पैकी ४०१, भातकुली ग्रामीण२२५ पैकी १६७, नगरपंचायत ५० पैकी ५०, बडनेरा विधानसभा व मनपा क्षेत्रात ४४६ पैकी ३३५ अशा एकूण ५ हजार ३७० पैकी ३ हजार ७९१ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. १ हजार ५७९ मतदारांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला नाही.

टॅग्स :Votingमतदान