लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता. प्रत्यक्षात शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले यातून कसाबसा मार्ग काढला. त्यातही शेतमाल बेभावे विकवा लागत आहे, अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच शेतकºयांवर आली आहे. या तीन वर्षांत या शासनाने शेतकºयांचे वाटोळे केले आहे. या तीन वर्षांत झाला तेवढा दु:खी शेतकरी कधीच झालेला नाही. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूंग आदी पिकांचे भाव कमालीचे घसरले आहे. १००० ते १५०० रूपये प्रतिक्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चाच्यावर ५० टक्के भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर दिलेले एकही आश्वासने पाळले नाही. त्याचमुळे शेतकºयांवर ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी शेतकºयांचे कर्जखाते नील केल्याचा उहापोह मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे शेतकºयांना ही दिवाळी चांगली जाणार, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा झालाच नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधाराच गेली. ही शेतकºयांची फसवणूक नाही तर काय, असा प्रतिप्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला.शेतकºयांना प्रतिक्विंटल १००० रुपये बोनस द्यासोयाबीनचे भाव ३००० रुपये असताना त्यांना १००० ते १५०० दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. संत्रा, तूर, उडीद, मूग पिकांची हीच स्थिती आहे. कापूसदेखील बेभाव विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. शासनाला खरचं शेतकºयांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असल्यास व शेतकरी आत्महत्या थांबवावयाच्या असतील तर त्यांच्या पिकाला प्रति क्विंटल १००० रुपये बोनस द्या तसेच कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन ठरले फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:30 PM
दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले. दिवाळी भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा उदोउदो केला होता.
ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस आक्रमक : बबलू देशमुखांचा आरोप