शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

डॉक्टरांना बदनाम कराल तर याद राखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:37 PM

शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देआयएमएचा इशारा : हा तर राजकीय पोळी शेकण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त करून अमरावती इंडियन मेडिकल असोसिएशनने या मानसिकतेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय पोळी शेकण्याच्या उद्देशाने डॉक्टरांचे केले जाणारे खच्चीकरण आणि चारित्र्यहनन निषेधार्ह आहे. यापुढे राजकीय पोळी शेकण्याकरिता डॉक्टरांचे नाव वापरून बदनाम केल्यास, त्याद्वारे समाजमन कलुषित केल्यास, आम्हाला गृहीत धरल्यास खबरदार! याद राखा - सडेतोड उत्तर देण्यास आम्हीही सक्षम आहोत, असा इशाराही आयएमएने दिला आहे.कायदेशीर मार्ग अवलंबावेरूग्णालय वा डॉक्टरांविषयी कुणाला काही तक्रार असल्यास ग्राहक मंच, आय.एम.ए., मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. तथापि स्वत: न्यायाधीश बनून समाज व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या धाग्यांची वीण उसविणे कितपत योग्य, असा सवालही आयएमएच्या सभेत उपस्थित करण्यात आला.केसपेपर्स देऊच, तुमच्याकडेआहेत काय तज्ज्ञ डॉक्टर ?स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून डॉक्टरांची मुस्कटदाबी करण्याचा निंदनीय प्रकार सुरू झालेला आहे. महानगर पालिका प्रशासनाने सर्व रूग्णालयांना काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या डेंग्यूच्या रूग्णांचे तपासणी रिपोर्ट व इस्पितळातील कागदपत्रे मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. माध्यमांतून तशी वृत्ते प्रसिद्ध झाली. हवे ते केसपेपर्स देण्यास आमची ना नाही; परंतु रुग्णांना बघितल्याशिवाय केवळ केसपेपर्सवरून निर्णायक मत नोंदविणारे उच्चविद्याविभूषित डॉक्टर महापालिकेकडे उपलब्ध आहेत काय, असा सवाल आयएमएने महापालिकेला केला आहे. तसे डॉक्टर नसतील, तर केसपेपर्स देण्याच्या प्रक्रियेला अर्थ उरतो तरी काय, असाही सूर उमटला.डॉक्टर व इस्पितळांनी रुग्ण आणि त्यांच्या आजारासंबंधी गोपनियता बाळगणे बंधनकारक आहे. महापालिकेला पुरविण्यात आलेले केसपेर्स लीक झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, याचेही उत्तर महापालिकेने द्यावे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.का संतापले डॉक्टर्स? काय आहे प्रकरण?शहरात डेंग्यूचे थैमान आहे. महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय चमू नाही. खासगी डॉक्टरांकडे डेंग्यूच्या रुग्णांचा ओघ वाढला आहे. झोपही अशक्य व्हावी इतके डॉक्टर डेंग्यू आणि इतर साथीच्या रुग्णांमध्ये व्यस्त असताना, ज्यांनी डेंग्यू असल्याचे निदान केले, अशा डॉक्टरांचेच केसपेपर महापालिकेने मागविले. त्या केसपेपर्सची तपासणी करून त्यात काही गैर आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या बैठकीत देण्यात आला होता. या कृतीमुळे डॉक्टरांवर अविश्वास तयार झाला आहे. डेंग्यू नसतानाही डेंग्यू असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांची लूट केली जात आहे, असे चित्र उभे केले गेले. प्रामाणिक प्रयत्नांना असे बदनाम केले जात असल्याने डॉक्टरांची संघटना संतप्त झाली आहे.

अपयश महापालिकेचे, खापर डॉक्टरांवरडास निर्मूलनात आलेले अपयश, शहरात सर्वत्र विखुरलेला ओला कचरा, पावसानंतर तुंबलेल्या नाल्या, रखडलेली भुयारी गटार योजना आदी बाबींमुळे डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा उद्रेक रोखण्यास प्रशासन कमजोर पडले. याचे खापर मात्र डॉक्टरांच्या माथी फोडले. अमरावती शहरात डेंग्यूच नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महापालिकेतील बैठकीत निष्पन्न झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्या गेल्या, हे हास्यास्पद असल्याचे मत नोंदवून खरे तर डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर स्थिती हाताळण्यास महापालिका प्रशासनाकडे सक्षम आरोग्ययंत्रणाच अस्तित्वात नाही, हे वास्तव डॉक्टरांनी उघड केले.एनएस-वन सक्षम चाचणीमहाराष्ट्रात उच्चस्तरावर शासकीय सेवेत असणाऱ्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचा हवाला देऊन आयएमएने सर्व प्रशासन आणि समाजाला उद्देशून एनएस-वन ही चाचणी सक्षम असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले. खासगी पॅथॉलॉजीस्तरावर उपलब्ध असलेली डेंग्यू रोगनिदानासाठीची एनएस-१ चाचणी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीद्वारे यवतमाळ मेडिकल कॉलेज येथे उपलब्ध करविलेल्या इतर चाचण्यांइतक्याच सक्षम असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.एनएस-वन अँटिजन चाचणी आजाराच्या अगदी सुरुवातीच्या काळात पॉझीटीव्ह येते. त्याच्या आधारे होणारे निदान ग्राह्य धरले जाते. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे करण्यात येणारी आय.जी.एम. ही चाचणी अँटीबॉडी चाचणी आहे. ती आठवडाभरानंतर पॉझिटिव्ह येते. या दोन्ही चाचण्या भिन्न असून, आपापल्या जागी निर्णायक आहेत. त्यांची तुलना करता येत नाही, असेही आयएमएने महानगर प्रशासनाला ठणकावले आहे. चाचण्यांच्या मुद्यांवरूनच महापालिका प्रशासनाने शहरातील तमाम डॉक्टरांवर अविश्वासाची राळ उठविली होती. नोटीशीही जारी केल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.का केले जाते रुग्णाला दाखल?नुसते डेंग्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून रुग्णाला भरती केले जात नाही. एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह असेल, प्लेटलेट्स व पांढºया पेशी कमी झालेल्या असतील आणि रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणे दिसत असतील अथवा आय.जी.जी., आय.जी.एम. चाचणी पॉझिटिव्ह असेल, प्लेटलेट्स व पांढºया पेशी कमी झालेल्या असतील आणि रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणे असतील, याशिवाय रुग्णाला १०३ च्या वर ताप येत असेल, उलटी येणे, चक्कर येणे, अन्नावरची वासना उडणे अशी लक्षणे दिसत असतील, त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी झाले असेल, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, लघवी कमी होणे, तीव्र पोटशूळ उठणे, शरीरावर पुरळ, हृदयाची मंदावलेली गती, रक्तातील आॅक्सिजनचे मंदावलेले पामाण आणि किंवा डेंग्यूच्या विषाणूमुळे शरीरातील एक किंवा अनेक अवयव बाधित झालेले असतील, याव्यतिरिक्त खालावलेल्या तब्येतीमुळे नातेवाइकांचा रूग्णास भरती करून घेण्याचा आग्रह असेल, तरच रुग्णाला भरती केले जाते. हल्ली अनेक विषाणूजन्य आजारांच्या साथी सुरू आहेत. त्यात ही लक्षणे दिसल्यास रुग्णाला भरती करून उपचार देण्याची गरज असते.