शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

By उज्वल भालेकर | Published: October 16, 2023 5:42 PM

धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध

अमरावती : आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये आता नवा वाटेकरी नको. धनगर ही जात आहे ती जमात नाही. सरकारने जर धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला तर आदिवासी पेटून उठेल असा इशाराच सकल आदिवासी संघर्ष समितीने जन आक्रोश मोर्चातून दिला आहे. सोमवारी आदिवासींच्या विविध मागण्यासंदर्भात शहरातील नेहरू मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो आदिवासी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाज बांधवांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी धनगर नेते गोपीचंद पडळकर यांची तिवसा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर सभादेखील पार पडली. परंतु आता धनगर आरक्षणाच्या विरोधात राज्यभरातील आदिवासी बांधवदेखील पेटून उठले आहेत. अनुसूचित जमातीच्या साडेसात टक्के हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचीही घुसखोरी आदिवासी सहन करणार नाही, असा इशारा देत आदिवासी संघर्ष समितीने जन आक्रोश मोर्चा काढला.

राजकमल चौक येथील नेहरू मैदानातून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येत महिला तसेच युवक सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधी घोषणबाजी करत धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध करण्यात आला. आदिवासींच्या म्हणण्यानुसार धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करू शकत नसतानाही आदिवासी बांधवांना वारंवार डिवचण्याचा प्रकार करत आहेत.

धनगर ही जात असून त्यांना भटक्यात जाती एनटीसी मधून ३.५ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे जर अनुसूचित जमातीमध्ये धनगरांची घुसखोरी झाली तर आदिवासी बांधव पेटून उठेल असा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व अर्जुन युवनाते, रोहित झाकर्डे, पवन वाढवे, सोम सोळंके, लक्ष्मण सोळंके, कमल उईके, शंकर शिरसाग महेंद्र कोडापे, ऋषिकेश लाव्हरे, पवन सोळंके, पवन चांदेकर, श्रावण उईके, नितीन नामुर्ते, संदीप कुमरे यांनी केले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणagitationआंदोलनAmravatiअमरावती