शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

भक्तीधागा उसवू नये !

By admin | Published: May 06, 2017 12:04 AM

अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते-

प्रासंगिक

गणेश देशमुखअमरावती : अंबादेवीच्या अंगाऱ्यात पाल आढळली. श्रद्धेने, विश्वासाने जेथे मान झुकते- त्या आई अंबेच्या आशीर्वादाचे स्वरूप असलेल्या अंगाऱ्यात विषारी प्राणी, कीटक संचार करीत असतील तर तो भाविकांच्या विश्वासाशी होणारा घातच नव्हे काय?आई अंबेच्या दर्शनासाठी जाणारे भाविक घरून निघतानाच श्रद्धेच्या सागरात आकंठ डुंबलेले असतात. अंबामाईच्या चरणांशी भाविक माथा टेकतात, त्यावेळी जणू हृदय ओंजळीत ठेवून तेही अर्पण केले जाते! भावनांनी ओथंबलेल्या त्या क्षणी अंगाऱ्याचे महत्त्व अर्थातच अनन्यसाधारण. ज्या वास्तूत आई अंबेचे वास्तव्य आहे, त्या वास्तुबाबत आणि आई अंबेच्या भक्तीप्रक्रियेशी जुळलेल्या हरेक वस्तुबाबत पवित्रतेचा तोच ओसंडून वाहणारा भाव भाविकांच्या रोमारामातून उत्सर्जित होत असतो. मंदिरात जे-जे काही आहे ते-ते पवित्रच, हा भाव त्या क्षणांना प्रबळ असतो. अंगारा, प्रसाद, तीर्थ या प्रसादांच्या विविध रुपांच्या माध्यमातून शरीरात पवित्र शक्तीचा प्रवेश आणि संचार होतो, असा दुर्दम्य विश्वास बाळगून प्रसाद, अंगारा, तीर्थ ग्रहण केले जाते. परंतु त्या अंगाऱ्यातच विष असेल तर? विचारही करवत नाही ना! पण हे प्रत्यक्षात घडले आहे. अंबादेवीच्या अंगारापात्रात विषारी मानल्या जाणाऱ्या पालीचे पिलू आढळून आले आहे. काळजात धस्स व्हावे, असा हा प्रकार वाढदिवसाची शुभ सुरुवात करण्यासाठी म्हणून सहकुटुंब अंबामंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भक्ताच्याच लक्षात आला. पोटच्या चिमुकल्यांनी तो अंगारा जिव्हेवर ठेवला होता. त्यांना काही झाले तर नसेल ना, अशी चिंता बाप म्हणून त्या भक्ताच्या काळजात चर्रर्र करून गेली. त्या सजग भक्ताने अंगाऱ्यातील पाल कॅमेऱ्यात कैद केली. देणगी काऊंटरवर सूचनाही दिली. अंबादेवी संस्थानचा कारभार नियमसंगतपणे चालविण्याची जबाबदारी काही मंडळींनी स्वीकारली आहे. ही कायदेशीर जबाबदारी स्वीकारणारी मंडळी भक्तांंना विषमुक्त, किटकमुक्त, प्रदूषणमुक्त, संक्रमणमुक्त अंगारा, प्रसाद आणि तीर्थ पुरविण्यास बांधिल आहेत. अंबेच्या मंदिराचा कारभार सांभाळण्याची संधी हा मिरविण्याचा मुद्दा नसून तो असंख्य भक्तांच्या सोई-सुविधा उभारण्यासाठीची स्वीकारलेली जबाबदारी होय. उभे राहणेही न शिकलेल्या बाळाला अंबादेवीच्या पात्रातील अंगारा विश्वासाने चाटविला जातो. निरागसांपासून तर मरणशय्येवर खिळलेल्यांच्या पोटात शिरणाऱ्या अंगाऱ्यात कुठलाही घातक घटक नसावाच, याची जबाबदारी ही मंदिराच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या तमाम लोकांची आहे. कायद्याच्या चाकोरीत आणि आई अंबेच्या साक्षीने स्वीकारलेल्या या जबाबदारीची जाणीव किमान या घटनेनंतर तरी व्हावी. अंगाऱ्याच्या पात्राची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी तातडीने उपाय योजणे आणि भाविकांचा मंदिराशी जुळलेला भक्तीधागा कुठेही उसवला जाऊ नये, यासाठीची जबाबदारी लिलया पार पाडणे, याक्षणीचे आद्यकर्तव्य ठरावे.