आॅनलाईन लोकमतअमरावती : शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्याव्यतिरिक्त कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नये, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी बंड पुकारले. बीएलओची कामे नकोच, ही ठाम भूमिका घेऊन कामावर बहिष्कार टाकला व मागण्यांचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मागील आठ वर्षांपासून शिक्षकांद्वारा बीएलओ शिक्षक मतदार नोंदणी, छायाचित्रे गोळा करणे, आदर क्रमांकाचे संकलन, मतदार यादीसह प्रत्येक निवडणुकीत सहभाग नोंदविला आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनासह शाळेची अनेक कामे करून बीएलओची कामे करणे शक्य होत नसल्याने शिक्षकांनी बीएलओच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना आरटीई-२००९ नुसार दैनंदिन कर्तव्याचे कामात शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक कामे करणे अनुज्ञेय नाही. शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती हा आरटीईचे उल्लंघन असल्याचे समन्वय कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. बीएलओचे काम ऐच्छिक असून शिक्षकांना सक्ती करू नये. अन्य जिल्ह्यात ही कामे शिक्षकांकडून काढून घेण्यात आली आहेत, ही बाब त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षक समन्वय कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, किरण पाटील, सुनिल केने, वसीम फरहत, अमोलपारडे, उमेश चुनकीकर, राजेश सावरकर, सुरेंद्र मेटे, आशिष भुयार, रामदास कडू, गौरव काळे, नितीन कळंबे, गोविंदराव चव्हाण, मंगेश खेरडे, जावेद इकबाल, शहजाद अहेमद यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.
बीएलओची कामे नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:25 PM
शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्याव्यतिरिक्त कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नये, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी बंड पुकारले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अशैक्षणिक कामांवर बहिष्कार