शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

युवकांच्या डीपीवर ‘डू नॉट शेअर लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 5:00 AM

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘वाघ दाखवा - बक्षीस मिळवा’ अशी म्हण अनेक वर्षे प्रचलित झाली होती. परंतु, आता ती खोटी ठरू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकांनाही वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे. चिखलदरा शहरातील एका प्रेक्षणीय पॉइंटवर (लोकमतसुद्धा शिकाऱ्यांच्या भीतीने लोकेशन सांगणार नाही) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता चालणाऱ्या गुराख्यांना वाघोबा दिसले. त्यांनी याची माहिती छायाचित्रकार विन्सेंट चंदामी यांना दिला. त्यांनी आपल्या कॅमेरात वाघाला कैद केले.

ठळक मुद्देविदर्भाच्या नंदनवनात वाघोबाचे दर्शन; शिकाऱ्यांच्या भीतीने उचलले सकारात्मक पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर शुक्रवारी सायंकाळी एका पॉईंटवर स्थानिकांना वाघोबाने दर्शन दिले. कॅमेरात वाघ कैदही झाला. ही सर्वांसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी आनंदाची बाब असली तरी त्याहूनही महत्त्वपूर्ण म्हणजे, या वाघाचे लोकेशन कुठेच शेअर करू नका, अशा आशयाचा संदेश देणारे डीपी स्थानिक युवकांनी मोबाईलवर ठेवला. वाघ बचाव मोहिमेत युवकही सहभागी असल्याचा संदेश त्यांनी याद्वारे दिला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘वाघ दाखवा - बक्षीस मिळवा’ अशी म्हण अनेक वर्षे प्रचलित झाली होती. परंतु, आता ती खोटी ठरू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकांनाही वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे. चिखलदरा शहरातील एका प्रेक्षणीय पॉइंटवर (लोकमतसुद्धा शिकाऱ्यांच्या भीतीने लोकेशन सांगणार नाही) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता चालणाऱ्या गुराख्यांना वाघोबा दिसले. त्यांनी याची माहिती छायाचित्रकार विन्सेंट चंदामी यांना दिला. त्यांनी आपल्या कॅमेरात वाघाला कैद केले.दरम्यान, ग्रुपवर सदर डीपी जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याची विनंतीही युवकांनी केली. यामध्ये अतुल वानखडे, अमर गवई, मोहम्मद साबिर, रोहित वानखडे, मोहम्मद जाबिर, स्वप्निल दामले, करण तायडे, प्रशांत गवई, सौरभ चावरे, शुभम गवई, रोहित वानखडे, शुभम देवळेकर, शुभम पतिंगे, रोशन गायकवाड, जावेद खान, भारत डोंगरे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.अन्यथा कारवाईवाघ असेल, तर जंगल वाचेल आणि या वाघाला पाहण्यासाठीच पर्यटक येतील. त्यातून रोजगार मिळेल; नाही तर शिकारी पुन्हा वाघाची शिकार करतील. पर्यावरणाची ही साखळी जोडण्यासाठी संबंधित पॉइंटवर वाघ दिसल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरताच युवकांनी ‘मोबाईलच्या डीपीवर कृपया वाघाचे लोकेशन कोणालाच सांगू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू’ अशा ओळी डीपीवर झळकविल्या.पर्यटनस्थळावरील एका पॉईंटवर वाघ दिसल्यानंतर स्थानिक युवकांनी मोबाईलवर वाघाचे लोकेशन शेअर न करण्याचे ठेवलेले डीपी शासन-प्रशासन करीत असलेल्या कार्याची पावती आहे. हे प्रशंसनीय कार्य आहे- पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक मेळघाट वन्यजीव विभाग