अमरावती : भारतात मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण प्रत्येक घरात मिळत असून त्याला तणाव, कामातील व्यस्तता कारणीभूत आहे. त्यामुळे रोज एक तास योगा केल्यास शरीराला संयम, धैर्य आणि साहस प्राप्त होऊन मधुमेह आणि हृदयविकारावर सहज मात शक्य आहे, अशी माहिती योग संशोधक अरुण खोडस्कर यांनी दिली. सोमवार, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनी सर्वांनी रोज योगाभ्यासाचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक देश कुठल्या ना कुठल्या आजारासाठी प्रसिद्ध असते. त्याचप्रमाणे भारतात मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार सर्वाधिक प्रमाणात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे संशोधन केले आहे. त्यावर औषधोपचार घेताना रुग्णांचे नाकीनऊ येते. मात्र, जगण्यासाठी ते घेतातच. त्याऐवजी योगाभ्यास रोज १ तास केल्यास तीन महिन्यांनंतर औषधीदेखील घेण्याची गरज भासणार नाही, इतकी क्षमता योगात असल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा राग, त्यांनी केलेले गुन्हे यावर प्रत्यक्ष संशोधन केले आहे.
पॉईंटर
आसन : या आसनात शरीराची स्थिती वृक्षाप्रमाणे केली जाते. नियमित वृक्षासनाने शरीर सुदृढ होते. यामुळे रस्तवाहिनी सुरळीत होण्यास मदत होते. या आसनाने आयुष्य वाढविण्यास मदत होते.
पादहस्तासन : यात शरीर झुकवून पाय हाताच्या बोटावर आणले जाते. यामुळे नाकाशी संबंधित स्नायूच्या समन्वयकांना सुदृढ बनवून शरीर सुदृढ बनते. तसेच सहनशिलता तथा जागरुकता वाढीसाठी हे आसन उपयुक्त ठरते. पायाच्या मांसपेशींना गठीला पोटरी मजबुत बनण्यास मदत होते.
भद्रासन : भद्रासनाने शरीर सुदृढ बनते. मस्तिष्क स्थिर राहण्यास मदत होते. गुडघ्याचा आजार कमी करण्यासही उपयुक्त ठरते.
वज्रासन : या आसनामुळे मांडी आणि पोटरीची मांसपेशी सशक्त बनते. यामुळे पाचनशक्त वाढण्यास मदत होते.
उस्ट्रासन : यात शरीर उंटासमान स्थितीत यावे लागते. यामुळे दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशी योगासने नियमित केल्यास कुठल्याही आजाराला आपण बळी पडणार नाही, असे अरुण खोडस्कर यांनी सांगितले.