या सर्व बाबींचा परिणाम डॉक्टरांच्या कामकाजावरही झालेला आहे. सततच्या धावपळीने डॉक्टरांचे वजन घटले आहे. डॉक्टरांना व्यायाम करण्यासाठीही अपुरा वेळ पडत आहे. कधी कुठला फोन येईल याचा नेम नाही. डॉक्टर २४ तास ऑन कॉल आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे रेकॉर्डवरून दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण थोडा हलका झालेला आहे.
पॉइंटर
आहाराची अशी घ्या काळज
१ दररोज आहारामध्ये मोड आलेले कडधान्य घेतले पाहिजे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी डॉक्टरांना मोलाची मदत होते.
२ पिवळ्या रंगाची फळे सेवन करावे. यामध्ये आंबा, लिंबू, मोसंबी, संत्री आदी फळांचा समावेश असावा.
३ अंडी, दूध, प्रथिनेयुक्त डाळी जेवणात घ्याव्यात. याशिवाय सलाद आणि प्रोटीनयुक्त आहारावर भर द्यावी. हिरव्या पालेभाज्या आहारात नियमित वापरावेत. यामुळे डॉक्टरांना उत्तम आरोग्य ठेवण्यास मदत होते.
४ वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वाढत आहे. यासोबतच सारीचे रुग्णदेखील वाढलेले आहे. या सर्व रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांची दमछाक होताना दिसत आहे.
५. २४ तास डॉक्टरांना अलर्ट राहून काम पहावे लागत आहे.
बॉक्स
धावपळीमुळे वजन कमी झाले, २४ तास अलर्ट
जिल्हा सामान्य रुग्णालय
०१
डॉक्टरांची संख्या
०००
आरोग्य कर्मचारी
०००
कोट
रुग्ण वाढल्याने डॉक्टरांची दिनचर्या बदलली. सतत बैठका, वेबिनार या धावपळीत आपोआपच वजनही कमी झाले. मात्र, प्रत्येकजण तत्परतेने काम करीत आहे.
- डॉ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टरांना आठ तासांची ड्युटी आहे. याशिवाय २४ तास ऑन कॉल उपस्थित रहावे लागतात. कुठल्या वेळी काय अडचण येईल, सांगता येणार नाही. यामुळे डॉक्टरांची धावपळ कायम पहावयास मिळत आहे. कोरोनासारख्या महामारीला आटोक्यात आणता आले.
- डॉ. रविभूषण, सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालय
वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख म्हणून सर्वाधिक जबाबदारी माझ्यावर आहे. प्रत्येक ठिकाणी काही अडचणी आहेत काय, याची शहानिशा करावी लागते. अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडविण्यासाठी नियोजन करावे लागतात. अनेकदा ऑक्सिजनसाठी रात्री-अपरात्री निगराणी ठेवावी लागते. कोरोनाच्या परिस्थितीने डॉक्टरांकडे वेळच उरलेला नाही.
डॉ. अनिल देशमुख,अधिष्ठाता, पीडीएमसी