शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

अज्ञानी झाले डॉक्टर!

By admin | Published: April 08, 2016 11:59 PM

तुमच्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांची स्थिती चिंताजनक झाली आहे, अशी भविष्यवाणी वैद्यकशास्त्रचा अभ्यास नसलेल्या ...

हेल्थ क्लब : किडनी, लिव्हर, हृदयाचे सांगतात आरोग्यअमरावती : तुमच्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांची स्थिती चिंताजनक झाली आहे, अशी भविष्यवाणी वैद्यकशास्त्रचा अभ्यास नसलेल्या कुण्या सामान्य व्यक्तिने केली तर तुम्ही ती मानणार काय? नाही ना? परंतु सर्वत्र सुळसुळाट झालेल्या 'हेल्थ क्लब'मध्ये वैद्यकशास्त्रातील 'व'देखील ठाऊक नसलेल्या व्यक्ती नागरिकांच्या किडनी, लिव्हर, हृदयाचे आरोग्य सांगत सुटले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाने त्यांना प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. विदेशी कंपन्यांचे महागडे 'न्यूट्रीशन शेक' विकणाऱ्या या 'हेल्थ क्लब'मध्ये अत्यंत आक्षेपार्हरीत्या अवयवांच्या स्थितीबाबतची माहिती दिली जाते. तुमच्या शरीरातील हृदय, किडनी, लिव्हर, पाठीचा कणा, मसल्स असल्या महत्त्वपूर्ण भागांबाबत ठामपणे भाष्य करतात. शरीराचे हे भाग फॅट्समुळे अकार्यक्षम होऊ लागल्याचे ठामपणे सांगतात. हे अवयव कधीही बंद पडू शकतात, असे भाकीतही करतात. जी मंडळी ग्राहकांना त्यांच्या विविध अवयवांची माहिती देतात, त्यांना ते उल्लेख करीत असलेल्या अवयवांचे शरीरातील नेमके स्थान कुठे आहे, हेदेखील माहिती नसते. कुठल्या अवयवाचे कार्य काय, याचे सूक्ष्म ज्ञान त्यांना नसते. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विविध व्हिटामिन्स यांचे प्रमाण घातकरीत्या दिले गेलेत तर जबाबदार कोण, हा प्रश्न हेल्थ क्लबच्या कार्यप्रणालीतून निर्माण होतो. (विशेष प्रतिनिधी)सीएस, डीएचओ घेणार का दखल ?हेल्थ क्लबच्या माध्यमातून अज्ञानी लोक शरीरशास्त्र आणि आहार सेवनाविषयी मार्गदर्शन करीत आहेत. शरीरातील विविध अवयवांवर फॅट्स वाढल्यामुळे आता त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे अवयव कधीही कार्य थांबवू शकतात, अशा आशयाचा सल्ला अज्ञानी लोक राजरोसपणे देत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. पोलीस आयुक्तांनीही आवळाव्या मुसक्या'हेल्थ क्लब'च्या नावावर सुरू असलेला गोरखधंदा अधिकाधिक मिळकतीचा करण्यासाठी वैद्यक वा आहार शास्त्राचे कुठलेही शिक्षण नसलेले लोक वैद्यकीय सल्ले देऊ लागले आहेत. भय निर्माण करून 'न्यूट्रीशन शेक' विकणाऱ्या या बोगस आहारतज्ज्ञांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळायलाच हव्यात. बोगस डॉक्टरांप्रमाणेच ही अज्ञानी मंडळी दिशाभूल करीत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो.