फोटो - लोकमत विशेष
संडे हटके स्टोरी
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : अंधश्रद्धेच्या गर्तेत गेलेल्या मेळघाटात आदिवासी आजही लसीकरणासाठी तयार होत नाहीत. त्यांचे मन वळविण्यासाठी डॉक्टरांना काय-काय करावे लागेल, याचा नेम नाही. गत आठवड्यात अशाच एका घटनेत सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेहट्याखेडा येथे शेतात गर्भवती पत्नीसह असलेल्या आदिवासी शेतकऱ्याचा होकार मिळविण्यासाठी डॉक्टरांनी चक्क पेरणीसाठी घाम गाळला. ही घटना माहिती झाल्यानंतर हे डॉक्टर कौतुकास पात्र ठरले आहेत.
मेळघाटातील अतिदुर्गम रेहट्याखेडा, बोराट्याखेड्या, भवई ,तारुबांदा या आदिवासी पाड्यांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मागील एक वर्षापासून दीपक कुंडेटकर हे कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत परिचारिका प्रगती शिरस्कर, शांता उईके, एमपीडब्ल्यू बेठेकर, अमोल मेटकर, विजय धुर्वे हे कोविड लसीकरणासाठी जनजागृती व लसीकरण करीत आहेत. मेळघाटात आदिवासी नकार देत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
बॉक्स
गर्भवती पत्नीला घेऊन करीत होता पेरणी
शहरी भागात गर्भवती महिला विविध दवाखाने व डॉक्टरांचा सल्ला घेऊन आराम करतात. परंतु, रेहट्याखेडा येथील रामचंद्र चतुर व त्याची पत्नी सुगंती गर्भवती शेतात पतीसोबत ज्वारी व धान (भात) पेरणी करीत होती. तिची नियमित तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने शोध घेतला. सुगंती पतीसोबत शेतात ज्वारीची पेरणी करीत होती. डॉ दीपक कुंडेटकर चमू सह शेतात गेले, त्यांनी लसीकरण उच्चारताच या चतुर दाम्पत्याने प्रतिसाद नाही दिला उलट शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र डॉक्टर व कर्मचारी जिद्दीवर अडले . काही झालं तरी या १२ ते१३ जणांच्या कुटुंबात गर्भवतीची तपासणी तिला कीट व लसीकर होकार घेऊच मगच गावात जाऊ संवाद दरम्यान'' आम्हाला मारून टाकतो का" असे अनेक अपमानास्पद शब्द ऐकावे लागले तरीही त्यांनी ऐकले या बाबीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
बॉक्स
पेरणी करून दे अन डॉक्टर जुंपले बैल जोडीला
गर्भवती सुगंती समजूत घातली लसीकरणाचे महत्त्व पटविले पुन्हा तिने प्रतिप्रश्न केला "मग पेरणी कोण करून देईल "डॉक्टर म्हणाला मी मदत करतो म्हणीत खरंच डॉक्टरने ज्वारीच्या व धान पेरणीसाठी काही 20 ते 25 मिनिटं मदत केली हे पाहून आदिवासी कुटुंब लाजाळले डॉक्टरांच्या अथक प्रयत्न पुढे नमते झाले आणि लवकरच पेरणी आटपून लसीकरणाला येत असल्याचा शब्द दिला येत्या आठवड्यात त्यांचे लसीकरण आता केल्या जाणार आहे
बॉक्स
फक्त १०जणांचे लसीकरण
मेळघाटातील काही आदिवासी पाड्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झाल्याची अभिमानास्पद बाब पाहता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही कौतुक केले आहे अशाच रेहट्याखेडा येथे केवळ दहा जणांनी लसीकरण केले २२ जून तीस जणांच्या लसीकरणासाठी चंदू गेली होती आता पुढच्या आठवड्यात चतुर कुटुंबीयांची लसीकरण केल्या जाणार आहे त्यांनी स्वतःहूनच आता डॉक्टराला बोलावल्या चे दीपक कुंडेटवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले
कोट
रेड्याखेडा येथे गर्भवती महिलेची तपासणी व लसीकरणासाठी गेलो असता शेतात ती महिला पतीसह पेरणी करीत होती दोन्ही बाबीला त्यांनी नकार दिला पेरणीसाठी थोड्यावेळ मदत केली आणि त्यांचा होकार घेतला आता पुढील आठवड्यात त्यांचे लसीकरण केल्या जाणार आहे
दीपक कुंडेटवार
समुदाय आरोग्य अधिकारी
सेमाडोह ता चिखलदरा
030721\screenshot_2021-07-02-16-22-41.png
शेतात पेरणीची मदत करताना डॉक्टर कुंडेटवार