नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हॅलो, चक्की सुरू आहे का, दळण भेटते का, आज दळण कुठे आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांसमोर चौकात कोणी विचारणा केली, तर नक्कीच आपण यांना धान्य दळायचे आहे आणि त्याबद्दल दोघे एकमेकांना विचारत असल्याचा समज करून घेऊ. पण, ही चक्की पीठगिरणी नाही. दारूड्यांची आपसात दारू कुठे मिळत आहे, याची माहिती घेण्याचा हा कोडवर्क आहे.लॉकडाऊनमुळे सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने दारूड्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. अशातच परतवाडा-अचलपूर शहरातील शक्कलबाज दारूड्यांचा कोडवर्क चांगलाच चर्चेत आला आहे. लॉकडाऊनमुळे दारूड्यांचे घसे कोरडे पडले आहेत. देशी-विदेशी दुकाने, बीअर बार बंद आहेत. दारूच्या व्यसनाधीन झालेल्यांची चांगलीच गळचेपी होत आहे. दुसरीकडे अवैध देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. चोरून विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई होते. परिणामी असे दारूविक्रेते व मद्यपींची फजिती होत आहेदरम्यान, मेळघाटला लागून असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागात मद्यपींचा वावर वाढला आहे
मिल स्टॉपवर पोलिसांनी चोपलेजुळ्या शहरातील महत्त्वाचे काही ठिकाणांपैकी एक असलेल्या मिल कॉलनी स्टॉपवर सोमवारी रात्री गस्तीदरम्यान पानटपरी मागे पोते टाकून बसलेल्या काही दारूड्यांना पोलिसांनी चोपले. त्यांनी मिळेल त्या दिशेने पळ काढला. कोरोनामुळे संचारबंदी पाहता पोलिसांवर कामाचा ताण अधिक आहे रात्रंदिवस गस्त घालत कायदा-सुव्यवस्था सांभाळून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर, अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे व सरमसपुराचे ठाणेदार प्रकाश राऊत हे रमजान महिना पाहता, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी यांच्या मार्गदर्शनात जुळ्या शहराची सुरक्षा व्यवस्था सांभाळीत आहेत.
हातभट्टीची दामदुप्पट विक्रीअवैध दारू विकणारे पोलिसांच्या कारवाईने धास्तावले आहेत. दररोज नवनवीन भागात अंधाराचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने दारूची विक्री केली जात आहे. देशी-विदेशीची अनेकांजवळील साठा संपल्याने गावठी दारूविक्रीकडे त्यांचा कल आहे. २० रुपयांचा गावठीचा ग्लास ग्राहकाची हैसियत पाहून पन्नास रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती काहींनी दिली. तथापि, शहरीच नव्हे, ग्रामीण भागातही ओळखीच्या व्यक्तीलाच विक्री केली जात आहे.संचारबंदीत कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रात्रंदिवस पोलीस दक्ष आहेत. अवैध दारूविक्रीविरुद्ध कारवाया सुरू आहेत.- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा