शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 5:00 AM

कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे. 

ठळक मुद्देकॉलेज बंद, रक्तदान शिबिरेही नाहीत, रक्ताचा तुटवडा होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षीच उन्हाळा लागला की, रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने  रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदात्यांना  रक्तदान करण्याचे आवाहन होत आहे.कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दिवसाला ४० ते ५० रक्त पिशव्यांची मागणी आहे. याशिवाय सिकलसेल, अॅनेमिया, थॅलेसिमिया, प्रसुती व विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याची कमी ही शिबिरे भरुन काढतात, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी कोरोनाचे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या धाकाने रक्तदाते अलीकडे पुढे यायला तयार नाही. प्रशासन, सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद आता कमी झालेला आहे व त्यामुळेच आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचतो. सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर व दुसरा डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.

कोरोना संसर्गामुळे यंदा कॉलेजेस बंद राहिली आहे. ग्रामीण भागातही आता संसर्ग वाढलेला आहे त्यामुळे रक्तदाते समोर येत नाही. रक्तपिशव्यांचा साठा पुरेसा नाही. अशा परिस्थितीत लसीकरणापूर्वी रक्तदान न केल्यास पुढे २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आहे.

जीवनात रक्तदान हेे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपन केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचतो. त्यामुळे आतापर्यंत चार वेळा रक्तदान केलेले आहे. लसीकरणानंतर रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे मी लसीकरणापूर्वी रुग्णाला डोनर म्हणून रक्तदान केलेले आहे.- प्रसाद काळे, अमरावती

दरवर्षीच उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असतो. यंदा तर कोरोनाचा संर्सगच आहे. त्यामुळे  शिबिरे झालेली नाही. डोनरही कमी मिळत आहे. याशिवाय पाझ्मा दात्यांनाही सातत्यानी फोन करावा लागतो. आता लसीकरण सुरू झालेले आहे व सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने त्यापूर्वीच रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.- उमेश आगरकर, संपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBlood Bankरक्तपेढी