शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

रक्तपेढीकरिता २० लाखांची जागा दान

By admin | Published: August 19, 2016 12:22 AM

ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ व नागपूरच्या मो. रफी फॅन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला....

शाम खंडेलवाल यांची दानशूरता : स्वातंत्र्यदिनी गीतांचा बहारदार कार्यक्रम वरूड : ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ व नागपूरच्या मो. रफी फॅन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला देशभक्तीपर गीतांचा ‘गीतो के रंग, रक्तदाताओंके संग’ हा आॅर्केस्ट्रा स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात घेण्यात आला. यावेळी उद्योगपती व बाजार समितीचे संचालक शामलाल खंडेलवाल यांनी रक्तपेढीकरीता एक हजार चौरस फूट बाजारमूल्याप्रमाणे २० लाख रुपयांची जागा दान दिली. येथील रक्तदाता संघाच्या अभूतपूर्व कार्याची दखल नागपूरच्या मो.रफी फॅन्स क्लबचे संचालक मो. सलीम यांनी घेऊन स्वातंत्र्यदिनी ‘गीतो रंग, रक्तदाता के संग’ हा देशभक्तीपर सुमधूर गीतांचा कार्यक्रम मोफत सादर केला. यावेळी मनीष खंडेलवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शामलाल खंडेलवाल यांनी जागा दान दिली. इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जितेन शहा यांनी कॉफी मशिनकरिता १५ हजार रुपये दिले. मंगेश काठीवाले यांनी कार्यक्रमाकरिता सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. याबद्दल त्यांचा आ.अनिल बोंडे, माजी आमदर नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, ठाणेदार गोरख दिवे, बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, जायन्टसचे अध्यक्ष नितीन खेरडे, राकाँचे जितेन शहा, माजी तालुका तालुका आरोग्य अधिकारी नारायण फरकाडे आदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते आणि लावण्या देखील सादर करण्यात आल्यात. प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाकरिता ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटिये, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, दिलीप भोंडे, सचिव चरण सोनारे, शैलेश धोटे, संजय खासबागे, योगेश ठाकरे, पंंकज केचे, सुधाकर राऊत, प्रवीण खासबागे, सचिन परिहार, अतुल काळे, यशपाल जैन, रोशन दारोकर, आशिष वानखडे, मनोहर थेटे, मुन्ना चांडक, गजानन दापूरकर, मुकीन भाई आदींनी प्रयत्न केलेत. प्रास्ताविक सुधाकर राऊत, संचालन चरण सोनारे, आभार मो. सलीम यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)