अमरावती/ संदीप मानकर
मानसूनचा पाऊस सक्रिय झाला असून, अनलॉकमध्ये शहरातील हॉटेल तसेच जिल्ह्यातील हजारो किरकोळ खाद्यापदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र, पावसाळ्यात बाहेरचे खाणे, उघड्यावरचे खाणे, अती तेलकट खाण्यामुळे पोेटाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनानंतर आता आरोग्य जपणे महत्त्वाचे झाले आहे. शहरात शेकडो हॉटेल आहेत. तेवढ्याच हातगाड्या शहरातील विविध चौकात लागतात. त्याठिकाणी किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते उघड्यावरच चमचमीत खाद्यापदार्थांची विक्री करतात. अशा पदार्थांवर धूळ साचते. तसेच त्यावर अनेकदा माशासुद्धा बसतात. असे गरम चटकदार पदार्थ खाण्यात आल्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. अतिसार, मळमळ, डोके दुखणे व इतर पोटाचे आजार यातून होण्याची शक्यता असते असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
बॉक्स:
पावसाळ्यात हे खायला हवे
अ) हिरव्या फळ भाज्या, नारळ पाणी, प्रोटीनयुक्त पदार्थ
ब) रोज जेवणात ताक, दुधाचे पदार्थ असावे
क) मोड आलेले कडधान्य
ड) डाळीचे बेसनाचे पदार्थ
बॉक्स:
पावसाळ्यात हे खाणे टाळावे
अ) उघड्यावरील खाद्यपदार्थ, जंकफुड
ब) अति मसाल्याचे तसेच चायनिज पदार्थ
क) अती तलळलेले तेलकट पदार्थ
ड) फ्रिजमधील थंड पाणी पिणे किंवा बाहेरील पाणी
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
कोट
पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा, तसेच दूषित पाण्याचे सेवन करू नये, ताज्या फळभाज्या तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ खावे तसेच मोड आलेले कडधान्य रोज वाटीभर खाणे आरोग्यासाठी लाभकारी आहे. रोजच्या आहारात ताक, दुधजन्य पदार्थांचा कमी प्रमाणात वापर करावा?
डॉ. किरण निचत, आयुर्वेदिक तज्ज्ञ अमरावती
कोट
उघड्यावरील अन्य पदार्थ व अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने अतिसार, काविड, टायफाईड, तसेच जंताचे आजार व पोटाचे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरील अन्यपदार्थ टाळावे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती
बॉक्स:
रस्त्यावरील अन्य नकोच
अनलॉकमध्ये पंचवटी चौक, इर्विन चौक, राजकमल, जयस्तंभ चौकात तसेच शहरातील विविध चौकात हातगाड्यावर विविध प्रकारच्या खाद्यपदर्थांची विक्री केली जाते. तसेच चायनिज पदार्थांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र, असे उघड्यावरील पदार्थ पावसाळ्यात खाणे आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यावर बसलेली धूळ व माशा अन्न पदार्थ दूषित करतात. त्यामुळे रस्त्यावरील अन्यपदार्थ टाळले पाहिजे, असे डॉक्टरांचे मत आहे.