फोटो - जावरे १६ पी
(फोटो कॅप्शन परतवाडा अमरावती मार्गावर दोन बसफेऱ्या बदलूनही मिळेल त्या वाहनाने जातांना प्रवासी)
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : परतवाडा ते अमरावती हा ५० किलोमीटरचा प्रवास एसटी महामंडळाच्या बसने करायचा असेल तर सावध राहा.. कारण या मार्गावर महामंडळाच्या भंगार बसगाड्या कुठेही नादुरुस्त होऊन उभ्या होत, प्रवाशांना अर्धवट सोडत असल्याचा प्रकार पुन्हा गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रवाशांना आला. पहिल्यानंतर दुसरीही बस नादुरुस्त झाल्याने प्रवाशांनी रस्त्यावरच शिव्याशाप दिले.
जिल्ह्यात परतवाडा - अमरावती या मार्गावर सर्वाधिक प्रवासी वाहतूक आहे. परतवाडा, अमरावती, नागपूर, यवतमाळ व मध्य प्रदेशच्या काही जिल्ह्यातून सर्वाधिक प्रमाणात बसफेऱ्या याच मार्गावर धावतात. प्रत्येकी अर्धा तास ते वीस मिनिटांच्या फरकाने बसफेरी आहे. परंतु परतवाडा व अमरावती आगारातील महामंडळाच्या बसगाड्या प्रवाशांच्या जिवावर बेतणाऱ्या ठरल्या आहेत. गुरुवारी त्याचा प्रत्यय पुन्हा प्रवाशांना आला. याच बसफेरीत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण तेलगोटेसुद्धा अमरावतीवरून परतवाडासाठी निघाले होते. त्यांच्यासह सर्वच प्रवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागला.
बॉक्स
टपकणारे छत आणि ओल्या खुर्च्या
महामंडळ आर्थिक अडचणीत असले तरी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसगाड्या भंगार अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्या दहा लक्ष किलोमीटरपेक्षा अधिक धावल्याने कालबाह्य झाल्या आहेत. उर्वरित गाड्यांची अवस्था खिडक्यांच्या काचा फुटलेल्या तर काही ठिकाणी रबर निघाल्याने पावसाच्या पाण्याचे फवारे अंगावर घेत प्रवास करावा लागलो. त्यावर कळस म्हणजे एमएच ४०-८१९२ क्रमांकाची बस व त्यातील प्रवासी आसनाच्या खुर्च्या ओल्याच होत्या. प्रवाशांनी रुमालाने कुणी कपडे काढून पुसल्या.
बॉक्स
पहिलीत बिघाड अन् दुसरीही..
एमएच ४०-८१९२ क्रमांकाच्या बसफेरीत अमरावतीवरून निघालेले प्रवासी भूगाव नजीक आले आणि पुलानजीक बस बंद पडली. तांत्रिक बिघाड झाल्याचे चालकाने सांगितले. मागून १० मिनिटात एमएच ४० एच ८१८४ क्रमांकाची बस आली. वाहकाने त्या बसमध्ये अर्ध्या प्रवाशांना बसून दिले. पाच मिनिटात पुढे गेल्यावर त्याही बसगाडीत बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर येऊन सामान अंगाखांद्यासह डोक्यावर व मुलाबाळांसह पायी चालून मिळेल त्या वाहनाने कसेबसे परतवाडा पोहोचले.
कोट
गुरुवारी सकाळी अमरावती परतवाडा महामंडळाच्या बसफेरीत प्रवास केला. दोन्ही बसगाड्या रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे माझ्यासह अनेक प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने पावसात भिजत परतवाडा गाठावे लागले.
प्रवीण तेलगोटे
परतवाडा (प्रवासी)
160921\1355-img-20210916-wa0015.jpg
एसटीचा प्रवास नको बाबा डोक्याला ताप