अमरावती : मौजे वडाळी, प्रगणे नांदगाव पेठ अंतर्गत सर्वे क्रमांक ६९/२ मध्ये २.८३ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेचे भोगवटदार वर्ग- १ जागेचे कुळधारक हेच मालक आहेत. अन्य कोणतेही धार्मिक संस्थान, व्यक्तींचा संबंध नाही, अशी माहिती माधव शेंडे यांच्या कुटुंबीयांनी पत्रपरिषदेत दिली.
वडाळी येथील या जागेचे गत ४५ वर्षांपासून माधव सीताराम शेंडे हे कुळधारक आहेत. १९५३-९१५४ मध्ये तशी नोद करण्यात आली आहे. त्यामुळे माधव शेंडे यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबीयांचे नावांची कुळधारक म्हणून नोंद झाली. मात्र, ही जागा अनेकदा महादेव संस्थानने हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेपही घेण्यात
आला. न्यायालयात हे प्रकरण चालले आणि शेंडे यांच्या कुटुंबीयांच्या बाजुने निकाल लागला. मात्र, या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला. ही जागा शेंडे कुटुंबीयांची असून, महादेव संस्थानचा दुरान्वये संबंध नाही, असा ठोस दावा करण्यात आला आहे. या जागेवर वक्रदृष्टी ठेवून काही जण नागरिकांमध्ये अफवा पसरवित आहे. ही जागा शेंडे कुटुबींयांची असून, ती शेवटपर्यंत राहील, असेही विजय शेंडे, विनोद शेंडे, माधुरी शेंडे, माधवराव शेलार या सदस्यांनी स्पष्ट केले.
----------------
शेंडे यांच्याकडे कायदेशीर भक्कम आधार
माधव शेंडे यांच्यामार्फत ॲड. उमेश ईंगळे, ॲड. आशिष मनवर यांनी वडाळी येथील या जागेवर कुळधारकांचा ताबा असणार आहे, सन १९८४-८५ पासून न्यायालयात प्रकरण सुरू आहे. ३५ ते ३८ वर्षानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयातही हे प्रकरण चालले. यात प्रत्येक निकाल हा शेंडे कुटुबीयांच्या बाजुने
लागला. एवढेच नव्हे तर जागेची विक्री आणि अधिकार हे शेंडे कुटुंबीयांनाच मिळाले आहे. त्यामुळे कायदेशीरपणे जागेची विक्री करण्यात आली आहे. मात्र, महादेव संस्थानकडून शेंडे कुटुबीयांवर राजकीय
दबाव आणला जात असल्याचे विधीज्ञ्जांनी सांगितले.