शहरं
Join us  
Trending Stories
1
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
2
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
3
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
4
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
5
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
6
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
7
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
8
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
9
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
10
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
11
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
12
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
13
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
14
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
15
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
16
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
17
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
18
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
19
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
20
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं

डझनभर हेल्थ अँड वेलनेस सेंटर कागदोपत्रीच; डेडलाइन हुकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 6:16 PM

शहरात १२ विविध ठिकाणी १५ डिसेंबरपासून महापालिकेचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू होणार असल्याचा दावा मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता.

अमरावती :

शहरात १२ विविध ठिकाणी १५ डिसेंबरपासून महापालिकेचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरू होणार असल्याचा दावा मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता. त्याअनुषंगाने १६ डिसेंबर रोजी त्या ठिकाणांची पाहणी केली असता एकाही ठिकाणचे हेल्थ अँड वेलनेस सेंटर कार्यान्वित झाले नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेचा तो दावा खोटा ठरला आहे. विशेष म्हणजे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी अधिनस्थ यंत्रणेला १५ डिसेंबरची डेडलाइन दिली होती. प्रत्यक्षात चार ते पाच ठिकाणी केवळ प्राथमिक बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये हृदयरोग, मधुमेह असलेल्या रुग्णांची तपासणी, औषधोपचार, आहाराबाबत सल्ला तसेच व्यायाम याबाबत तर मार्गदर्शन केले जाईल. शिवाय साथरोग, महिलांचे आजार याबाबत मार्गदर्शन, उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपाच्या दवाखान्यांसोबतच आता उपचारासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा नवा पर्याय शहरवासीयांना उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा व आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते त्या केंद्राचे दोन आठवड्यांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते.

२.५८ कोटींचा निधीआयुष्मान भारत योजनेंतर्गत मनपाला १२ हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली. प्रत्येक दवाखान्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी २१.५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातून मनपाला त्यासाठी एकूण २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या ठिकाणी एक डाॅक्टर, एक स्टाफ नर्स, मल्टिपर्पज वर्कर (एमपीडब्ल्यू), आशा सेविका आणि अटेंडंट असे ५ व एकूण ६० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये काय ?गरोदरपणा आणि बाळंतपणातील काळजी, नवजात शिशू आरोग्य सेवा, बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक आणि इतर प्रजनन आरोग्य सेवा, साथरोगांसंबंधी सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, लहान आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोगांसाठी स्क्रीनिंग, प्रतिबंधात्मक, नियंत्रण आणि उपचार सेवा, सामान्य नेत्र आणि कान-नाक-घसा यांचे आजारांसंबंधी सेवा, मूलभूत मौखिक आरोग्य सेवा, वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मूलभूत मानसिक विकारांसाठी स्क्रीनिंग आणि प्राथमिक उपचार सेवा, योगा आणि इतर आयुष सेवा.

येथे बनणार हेल्थ अँड वेलनेस सेंटरझोन क्रं. १ मध्ये नवसारी गावठाण- मनपा शाळा, रहाटगावचा दवाखाना पूर्ण वेळ, राधा नगर, गाडगे नगर (प्रगती शाळा),झोन क्रमांक २ : अंबिका नगर, मनपा शाळा, रुक्मिणी नगर, मराठी शाळा नं. १९, बजरंग प्लॉट, शाळा नं. ८, शारदा नगर, पन्नालाल बगीचामधील एक हॉल, झोन क्रं. ३ मध्ये शुक्रवार बाजारातील एक हॉल, चपराशीपुरा उर्दू मनपा शाळा नं. ६, झोन क्रं. चारमध्ये अकोलीमध्ये एक खोली, मनपा शाळा नं. २४ बडनेरा, माया नगर.