अमरावती : शहर आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या २४ तासात चोरीचा आकडा डझपावर गेला आहे. पोलिसांनी त्या घटनांप्रकरणी अज्ञातांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे. कोरोनामुळे विस्कटलेले जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत असताना सराईतांप्रमाणेच भुरटे चोर देखील वाढले आहेत. घरासमोर ठेवलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह ते लोखंड व अन्य साहित्यावर डल्ला मारत सुटले आहेत. शाळा, वस्तीगूह देखील त्या भुरट्यांनी लक्ष्य केले आहेत.
३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जमील कॉलनी भागातून एमएच २७ सीई ६४१३ ही दुचाकी लांबविण्यात आली. जफर इरफान (४८, जमील कॉलनी) हे पानटपरीजवळ दुचाकी उभी करून नमाज आदा करण्यााकरिता गेले होते. सीसीटिव्हीत चोरदेखील बंदिस्त झाले. नांदगाव पेठ हद्दीतील आतिश उईके यांच्या घरातून १ लाख ५१ हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले. ३ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघड झाला. याशिवाय चोर शिवारात देखील शिरले असून, तेथील पाण्याची मोटर, केबलकडे त्यांनी वक्रदृष्टी वळविली आहे.
////////////
पीडीएमसीतून बॅग लंपासअमरावती: स्थानिक पीडीएमसीतून बॅग लंपास करण्यात आली. त्यात पॅनकार्ड, आधारकार्ड, मोबाईल व ४ हजार रूपये रोख असा ९ हजारांचा ऐवज चोरीला गेला. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. उत्तमनगर येथील ४० वर्षीय महिला मुलीचे ब्लड सॅम्पल देण्याकरीता गेली असता, हा प्रकार घडला.
////////////
बॉक्स
आदिवासी वसतिगृहात चोरी
अमरावती : येथील शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या व आदिवासी वसतिगृहातून १५, २०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले. यात डेस्कटॉप, किबोर्ड, प्रिंटरचा समावेश आहे. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना उघड झाली. अनिल तसरे यांच्या तक्रारीवरून नागपूरीगेट पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
////////////////
‘पेट्रोलिंग’ची मागणी
पोलिसांनी वेळेवर पेट्रोलिंग केल्यास भुरट्या चोरट्यांवर आळा बसेल. तसेच ठिकठिकाणी गटा-गटाने बसणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी वचक ठेवल्यास चोऱ्या होणारच नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांसमोर भुरट्या चोरांवर आवर घालण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
//////////