शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:13 AM

विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (इतिहास) अभ्यासक्रमात ‘डॉ. ...

विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (इतिहास) अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन विद्वत परिषदेच्या सभेत याअनुषंगाने निर्णय घेण्यात आला. विद्यापीठात पहिल्यांदाच पदवी अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिकविले जाणार आहेत.

विद्यापीठाच्या इतिहास मंडळाने बी.ए. भाग १, २ व ३ च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२० रोजी अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेतील सहभागी प्राध्यापकांनी अभ्यासक्रमात सुचविलेले बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रम बदल समितीची स्थापना करण्यात आली. या अभ्यासक्रमांची मांडणी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संतोष बनसोड यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान व भारताच्या स्वातंत्र्याची १९४५ ची योजना’ या घटकाचा सर्वानुमते समावेश करण्यात आला. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या १० सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत या विषयाला मान्यता प्रदान करण्यात आली.

-----------------------

विद्या परिषदेत शुक्रवारी शिक्कामोर्तब

विद्यापीठाने ४ डिसेंबर रोजी विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक घेतली. यात सदस्यांनी चर्चा करून बी.ए. भाग २ सत्र ४ च्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रविषयक कार्य व त्यांची १९४५ ची स्वातंत्र्य योजना’ हा घटक समाविष्ट करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

-------------------

कोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानव मुक्तिदाते होते. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी बी.ए. इतिहास अभ्यासक्रमात ‘डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. हीच खरी त्यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली ठरेल.

- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

--------------------

कोट

घटनाकार व अस्पृश्योद्धारक एवढ्याच मर्यादित स्वरूपात न ठेवता डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीतील योगदान विद्यार्थी व समाजासमोर येणे गरजेचे होते. म्हणून विद्या परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

- संतोष बनसोड, अध्यक्ष, इतिहास मंडळ, अमरावती विद्यापीठ.