अमरावती : येथील पंचशिल चौकात नवयुवक पंचशिल मंडळातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जी घटना डॉ. बाबासाहेबांनी या देशाला दिली, त्यामुळे मी आज आमदार होऊ शकली. तसेच महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, आयएएस, आयपीएस अधिकारी होऊ शकल्यात. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना हक्क प्राप्त करून दिल्याने आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे अस्तित्व निर्माण होऊ शकले, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी तपोवन परिरसराच्या विकासावरही प्रकाश टाकला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय खोडके, मंडळाचे अध्यक्ष जगदीश तायडे, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, राजेश निताळे, अजय आसोडे, राजूभाऊ खोरगडे, भीमराव वाठाेरे, जयश्री कठाने उपस्थित होते. संचालन नरेंद्र गुलदेवकर यांनी, तर आभार प्रदर्शन राजेश निताळे यांनी केले.
पंचशिल चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:12 AM