लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : येथील प्रथितशय वैद्यकीय तज्ञ डॉ. राजेंद्र भट्टड यांचा मृत्यू हृद्याघाताने नव्हे तर गळफास घेतल्याने झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन करणाऱ्या चमूने काढला आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे शिक्कामोर्तब करण्यात आल्याने शंकाकुशंकांना पुर्णविराम मिळाला आहे. डॉ. भट्टड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर त्यांच्या पत्नीने हृद्याघाताचा दावा का केला, हा प्रश्न तुर्तास अनुत्तरित आहे.डॉ. भट्टड यांच्या मृतदेह गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यांच्याच घरात आढळून आला होता. मात्र त्यांच्या पत्नीने त्यांचा मृत्यू आपल्यादेखत हृद्याघाताने झाला, असा दावा करुन शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. शिवसेना व मेडिकल संचालकांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करुन इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. पोलिसांनी डॉ. भट्टड यांच्या नातेवाईकांचे बयान नोंदविले. त्यानंतर भट्टड यांच्या शवविच्छेदनाची परवानगी त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. पोलिसांनीही आत्महत्येचाच प्राथमिक निष्कर्ष काढून भट्टड कुटुंबाला कायदयातील तरतुदीबाबत अवगत केले. शवविच्छेदनासाठी अमरावती येथील न्यायवैद्यकीय तज्ञ आशिष सालनकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गुंजन गुल्हाने व तिरुपती राठोड यांच्या सोबतीने ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम केले. स्थानिक स्मशानभूमित दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले. दरम्यान गळफास घेतलेल्या घटनास्थळावर पोलिसांच्या हाती ठोस असे काहीही लागू शकले नाही. याबाबत कुणी पुरावे नष्ट केले का?, डॉ. भट्टड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष योग्य असल्यास त्यांनी गळफास घेण्यासाठी कुठली वस्तू वा दोर वापरला, त्यांचा मृतदेह खाली कुणी काढला, या दिशेने पोलिसांनी तपास आरंभला आहे. दरम्यान गुरुवारी रात्री खासदार नवनीत राणा यांनी भट्टड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली. आ. प्रकाश भारसाकळे यांनी शवविच्छेदन होतेवेळी उपजिल्हा रुग्णालय गाठून परिस्थिती जाणली. डॉ. भट्टड यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलिसांनी चालविला आहे.मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. भट्टड यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, असा अंतिम निष्कर्ष आहे.- आशिष सालनकर, न्यायवैद्यकीय तज्ञ अमरावतीडॉ. भट्टड यांनी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो स्कार्फ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.- नरेंद्र दंबाडे,प्रभारी ठाणेदार
डॉ. भट्टड यांची आत्महत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 6:00 AM
डॉ. भट्टड यांच्या मृतदेह गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यांच्याच घरात आढळून आला होता. मात्र त्यांच्या पत्नीने त्यांचा मृत्यू आपल्यादेखत हृद्याघाताने झाला, असा दावा करुन शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. शिवसेना व मेडिकल संचालकांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करुन इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
ठळक मुद्देवैद्यकीय चमूकडून शिक्कामोर्तब : तणावात ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन