अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आज्ञेवरून मुंबई येथील भायखळा पोलीस हॉस्पिटलमधील सहायक वैद्यकीय अधिकारीपदाची नोकरी सोडून गुरुकुंज आश्रमातील श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात सेवा देणारे डॉ. महादेवराव नाकाडे यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात मंगळवारी रात्री निधन झाले.१९६० च्या काळातील वैद्यकीय सेवाव्रती म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील व्ही.व्ही.नारळीकर हे बनारस विश्व विद्यालयाचे कुलगुरू असताना त्यांच्याकडून दिलेल्या विशेष प्रवेशातून महादेवराव नाकाडे यांनी ए.बी.एम.एस. ही पदवी मिळविली तसेच आयुर्वेद वर्गात अध्यापन केले. दासटेकडीवरील रामकृष्ण हरी मंदिराचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा आप्तपरिवार आहे.
अमरावती जिल्ह्यातील सेवाव्रती डॉ. महादेवराव नाकाडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 6:19 PM