शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अधिग्रहणातील विहिरींना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:34 AM

चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली : खासगी ३७३ विहिरी अन् ६५ टँकरवर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात ३७३ खासगी विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तात्पुरता उपाय म्हणून अमरावती तालुक्यात बोडणा, परसोडा डिगरगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, मोझरी, भारवाडी, सार्सी, गुरुदेवनगर, घोटा, माळेगाव, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव आखतवाडा, पोरगव्हाण, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खुर्द, आमला, जळका, निमला, सावंगी, अमदोरी, धामणगाव तालुक्यात उसळगव्हाण, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, शिंदी, घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात सोमवारखेडा, भिलखेडा, मनभंग, आडनदी, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, भांदरी, खडीमल, कुलंगना, गौरखेडा, मोथा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोंगडा, आकी, नागापूर, एकझिरा व चौराकुंड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.उपाययोजनांची सद्यस्थितीआराखड्यानुसार १९३९ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यापैकी ८३३ गावांच्या ९५५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६८ गावांच्या ५४० उपाययोजनांची कामे सुरू आहेत, तर ३२१ गावांच्या ४०६ उपायोजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ८ कोटी ३ लाख ६७ हजारांचा निधी अपेक्षित आहे.१.१८ लाख नागरिकांचीमदार टँकरवरपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात १० तालुक्यांतील ६४ गावे व १,१८,२०२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. अमरावती तालुक्यातील तीन गावांत २४८९, तिवसा तालुक्यातील १० गावांत २७४९८,मोर्शी तालुक्यातील ११ गावांत १८१८९, वरूड तालुक्यातील एका गावात ३१९६, चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावांत १२४४५, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन गावांत २९६०, अचलपूर तालुक्यातील दोन गावांत २१५४७, चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ७५१२, चिखलदरा तालुक्यातील २६ गावांत १४८९९, धारणी तालुक्यातील एका गावांत १०५० लोकसंख्येची मदार टँकरवर आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई