शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

पाणीपुरवठ्याच्या पाण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 1:23 AM

पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असताना बेनोडा येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपवरून संत्रा जगविण्याचा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांत १ कोटी ४४ लाख लिटर पेयजलावर डल्ला मारला. या पाणीचोरीची अखेर ९ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली.

ठळक मुद्देदुष्काळातही संत्र्याच्या शेतात हिरवळ : १४४ लाख लिटर पेयजल चोरले, चार दिवसांनी गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असताना बेनोडा येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपवरून संत्रा जगविण्याचा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांत १ कोटी ४४ लाख लिटर पेयजलावर डल्ला मारला. या पाणीचोरीची अखेर ९ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली.बेनोडा येथे किसना वानखडे नामक संत्राउत्पादक शेतकरी संत्राझाडे जगवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी शेतातून टाकलेल्या ग्रामपंचायतच्या पाइप लाइनला छिद्र पाडून पाणी पळवत होता. यामुळे गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा व्हायचा. चहुबाजूला तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवत असताना या शेतात हिरवळ होती. त्यामुळे सरपंच विमल भलावी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नरेंद्र यावले, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह मनोज इंगोले, नरेंद्र रामचंद्र यावले, रोशन लाड, सतीश वानखडे, वासुदेव इंगोले, विजय पोटोडे आदी नागरिकांनी पाइप लाइनची पाहणी ५ एप्रिल रोजी केली. ग्रामपंचायतच्या १११ मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा पाइप लाइनला ठिबकच्या १६ मिमीच्या सहा नळ्या लावून ते पाणी संत्राबागेत ड्रिपद्वारे दोन विहिरी आणि ड्रिपच्या सर्व चारही सर्कीटमध्ये वळते केले होते. यासंदर्भात कारवाईची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती.अखेर ९ एप्रिल रोजी ग्रामविकास अधिकारी विनोद लोखंडे यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी किसना वानखडे (५८) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे ठाणेदार सुनील पाटील यांनी सांगितले. पुढील तपास पीएसआय वाळके, हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व साहेबराव राजस करीत आहेत.प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार द्यावी की दंड आकारावा, यासंदर्भात खल सुरू होता. अखेर ग्रामविकास अधिकारी लोखंडे यांनी मंगळवारी तक्रार दाखल केली. प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या सहभागाच्या चर्चेला गुन्हा दाखल होताच विराम लागला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई