अंतिम अधिसूचना नाही : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया गजानन मोहोड ल्ल अमरावतीतालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी क दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. याविषयी राजपत्रात पूर्व अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र अंतिम अधिसूचना सोमवार पर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासकाऐवजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी या ठिकाणी नगर पंचायतीचे स्वप्न तुर्तास भंगले आहे.औद्योगिक नगर विकास विभागाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम याचे कलम ३४१- क चे पोटकलम (१), (१ क) आणि (२) यांच्या तरतुदीनूसार शासन राजपत्रात उद्घोषीत प्रसिद्ध झाली. यावर आक्षेप, हरकती मागविल्या. तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी व भातकुली तालुक्यात कुठेही आक्षेप नसल्याने शासनाला अहवाल पाठविण्यात आले. २२ मार्च २०१५ रोजी नगर विकास विभागाने एक आदेश जारी करुन नगरपंचायतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचीत रचना होईपर्यंतच्या कालावधीत संबंधीत अधिकार प्रशासकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. विभागात दोन तालुका मुख्यालयी प्रशासकअमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असणाऱ्या संग्रामपूर व मोताळा आणि नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे ग्राम पंचायत सरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी तहसीलदार यांची प्रशासक म्हणून १४ मार्चला नियुक्ती करण्यात आली. हिच प्रक्रिया जिल्ह्यात देखील राबवायला पाहिजे होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिरंगाई केल्याचा नागरीकांचा आरोप आहे.सामान्य प्रशासन विभाग फाईल पडूनजिल्हा प्रशासनाद्वारे नगरविकास विभागाला नगरपंचायतींचे प्रस्ताव पाठविण्यात आले. नगर विकास विभागाने मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे. व मुख्यमंत्र्याचा असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात हि फाईल धूळखात आहे.तिवसा, भातकुली व नांदगाव खंडेश्वर या तालुका मुख्यालयी होणाऱ्या नगरपंचायत साठी अंतिम अधिसूचना अद्याप प्राप्त नाही त्यामुळे आयोगाचे आदेशाप्रमाणे ग्रामपंचात निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.राम सिद्धभट्टी,प्रभारी अधिकारी (नगरपरिषद)
तीन नगरपंचायतींचा स्वप्नभंग
By admin | Published: March 31, 2015 12:21 AM