आॅनलाईन लोकमतअमरावती : रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. यात मद्यपीदेखील मागे असणार नाहीत. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्राशनासाठी आॅनलाइन परवाना बंधनकारक केला आहे.‘थर्टी फर्स्ट’ची अनेकांना प्रतीक्षा असते. कोणी सहलीवर, पर्यटनस्थळी, तर कोणी घरीच आनंद लुटण्याचे प्लँनिग आखतात. विशेषत: मद्यपींना ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना त्यांच्या आनंदात व्यत्यय येऊ नये, याची एक्साइजने काळजी घेतली आहे. हॉटेल, ढाबे, संस्था, उद्यान, फार्म हाऊस अथवा आस्थापनेत सामूहिकपणे ‘ओली पार्टी’ करायची असल्यास दारू प्राशन करण्यासाठी अधिकृत परवाना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १०० पेक्षा संख्या कमी असल्यास ‘ओल्या पार्टी’साठी सात हजार रुपयांचे परवाना शुल्क, तर १०० पेक्षा जास्त संख्या असल्यास त्याकरिता १० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘सर्व्हिस’ अंतर्गत परवाने मिळतील, असे स्पष्ट केले आहे. यासोबतच मद्य प्राशन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही, या अटी-शर्तींवर आॅनलाइन परवाने दिले जाणार आहेत.दारूची अवैध वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथकनववर्षाच्या स्वागतप्रसंगी अवैध दारूविक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी स्वतंत्र पथके गठित करण्यात आली आहे. याशिवाय सीमेवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.गुन्हेगाराच्या घरांची झडती, पोलीस पथके सज्जनववर्षाच्या स्वागतापूर्वीच पोलिसांचे सरप्राइज चेकींग व कोम्बिंग आॅपरेशन, ४८ हद्दपारांची तपासणी, रेकॉर्डवरील टॉप टेन गुन्हेगारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राइव्हसाठी २९ ब्रिथ अॅनालायझर व दोन स्पीड गनचा वापर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त हॉटेल, लॉन, लॉज, मंगल कार्यालये तसेच गुन्हेगारांच्या आश्रयस्थानावर पोलिसांची चौकस नजर राहणार आहे. नववर्षाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शुक्रवारी बैठक बोलावून सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिल्या आहेत.‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना मद्यपींकडून धुमाकूळ किंवा सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊ नये, ही खबरदारी एक्साइज घेते. यंदा मद्यपींना दारू प्राशन करण्यासाठी आॅनलाइन परवाने देण्याची व्यवस्था आहे तसेच अवैध दारु विक्री, वाहतूक पथकाद्वारे रोखली जाणार आहे.- प्रमोद सोनोने, अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग
मद्यपींनो, आनंद लुटा पण आॅनलाईन परवाना घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:26 PM
रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे.
ठळक मुद्दे‘एक्साईज’चे आवाहन : शंभरापेक्षा कमी व्यक्तींकरिता सात हजार रुपये शुल्क