संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाईन शॉपीमधून दारू घेतल्यानंतर ती त्यापुढील सार्वजनिक ठिकाणी प्राशन करण्याचा प्रताप मद्यपींकडून होत आहे. हा प्रकार येथे नित्याचाच असून, संबंधित पोलिसांचे व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गाडगेनगरातील एका वाइन शॉपीतून दारू विकत घेऊन ती यथेच्छ ढोसली जात असल्याचे 'लोकमत'ने स्टिंगद्वारा उघड केले.मद्यपानामुळे होणाºया सामाजिक दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील बीअर बार व वाइन शॉपी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण, त्यातील काही जाचक अटी शासनाने रद्द केल्या आणि नव्या नियमात बसणारे बार किंवा वाइन शॉपी पुन्हा सुरू झाल्या. त्यामधून पार्सल विकत घेऊन त्यालगतच्या मोकळ्या जागेत मद्यप्राशन करण्याची एकही संधी मद्यपींनी सोडलेली नाही. कारण बारमध्ये बसून दारू पिण्यासाठी ग्राहकांना वेगळे चार्जेस द्यावे लागत लागतात.सोमवारी असाच प्रकार गाडगेनगर ते राठीनगर मार्गावरील एका वाइन शॉपीसमोर घडला. दोन मद्यपी सायंकाळी ५ वाजता दरम्यान तेथे आले. त्यांनी सदर शॉपीमधून दारूची कुपी विकत घेतली. बाहेर आल्यानंतर बॉटलमधील पाणी व दारू डिस्पोजल ग्लासमध्ये टाकली आणि तोंडाला लावली. सदर वाइनशॉपीसमोरच शासकीय तंत्रनिकेतन आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले-मुली याच परिसरात भाड्याने राहतात. या ठिकाणीच शॉपीतून घेतलेली दारूची पार्टी झोडून निघून जाण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे.एक्साईज विभागाच्या तपासण्या थंडावल्यानव्याने जे बार व वाइन शॉपी सुरू झाल्यात, त्या बारचे किंवा वाइन शॉपीचे मालक कधीच उत्पादन शुल्क विभागांच्या नियमावलीनुसार वागत नाहीत. वाइन शॉपी समोर कुणीही उघड्यावर दारू पिऊ नये व जर असा प्रकार होत असेल, तर असा प्रकार रोखणे ही वाइन शॉपीचालकाचीही जबाबदारी आहे. पण, असे होताना दिसत नाही. वाइन शॉपीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. परंतु, बार व वाइन शॉपी नियमात सुरू आहेत की नाही, याची तपासणी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करीत नाही. त्यामुळे ते काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.ज्या ठिकाणी असा प्रकार चालतो, तेथे निरीक्षक पाठवून कारवाई करण्यात येईल. वाइन शॉपी चालकांनी सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करायला हवी- प्रमोेद सोनवणे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
गाडगेनगरात वाईनशॉपीसमोर उघड्यावर मद्यप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:18 PM
वाईन शॉपीमधून दारू घेतल्यानंतर ती त्यापुढील सार्वजनिक ठिकाणी प्राशन करण्याचा प्रताप मद्यपींकडून होत आहे. हा प्रकार येथे नित्याचाच असून, संबंधित पोलिसांचे व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देपोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : नियंत्रण कुणाचे? नागरिकांचा सवाल