शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चौथ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:11 AM

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या ...

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात ३३३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत ४३६.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी १३१ आहे.

जिल्ह्यात ४८ तासांत धारणी तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पावसाने जिल्ह्यातील ३२ गावे बाधित झाली. यात २६२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर ४६ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुसळधार पावसाने भातकुली तालुक्यातील १७ गावे बाधित झाली. यामध्ये ८८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ गावांमध्ये ३८ घरांची पडझड व ६८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय चिखलदरा तालुक्यात आठ घरे व १०८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. धारणी तालुक्यातील धारणी, हरिसाल, धूळघाट, सावलीखेडा व साद्राबाडी या महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असताना घरे व पिकांचे नुकसान निरंक आहे.

बॉक्स

आतापर्यत तालुकानिहाय पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत ४३६.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ४२४.७ मिमी, चिखलदरा ४२३.४, अमरावती ३४५, भातकुली ३९, नांदगाव खंडेश्वर ४४५.९, चांदूर रेल्वे ४५९.२, तिवसा ३२३.८, मोर्शी ३२८.१, वरूड ४०९, दर्यापूर ४४५.२, अंजनगाव सुर्जी ४८०.१, अचलपूर ३५७.६, अंजनगाव सुर्जी ४८०, अचलपूर ३५७.६ चांदूर बाजार ३४१ व धामणगाव तालुक्यात ४०४.१ मिमी पावसाची नोंद झाली.