शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

व्याघ्र प्रकल्पाच्या ड्रोन कॅमेऱ्याची मेळघाटातील स्त्रियांमध्ये वेगळीच दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:38 PM

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावावर मागील काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्याने सतत चित्रीकरण दिवसातून चार वेळा केले जात आहे, अशा महिला भगिनींना स्नानगृहासह इतर स्वातंत्र्य हिरावले असून, ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसेमाडोहवासीयांची नवनीत राणा यांच्याकडे तक्रारविविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावावर मागील काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्याने सतत चित्रीकरण दिवसातून चार वेळा केले जात आहे, अशा महिला भगिनींना स्नानगृहासह इतर स्वातंत्र्य हिरावले असून, ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे. तक्रार करूनही अधिकारी ऐकत नसल्याने सोमवारी खासदार नवनीत राणा यांच्या पुढे नागरिकांसह महिलांनी आपली व्यथा मांडली सोबतच व्याकरण प्रकल्पाचा नाका हटविणे मजुरांचे अडकलेले वेतन आदी विविध समस्या मांडल्याव्याघ्र प्रकल्पाच्या वतीने गावावर दिवसातून तीन ते चार वेळा मनात येईल तसा ड्रोन कॅमेरा फिरविण्यात येतो गावातील अनेक घरांमध्ये असलेल्या स्नानगृहवर छत नाही. त्यामुळे महिलांमध्ये या ड्रोन कॅमेराची दहशत निर्माण झाली आहे, तो कॅमेरा कशासाठी फिरवण्यात येतो याचे उत्तर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी देत नसून केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे सोमवारी एका लेखी निवेदनात खासदार नवनीत राणा यांना सेमाडोह येथे गावकऱ्यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची चिथावणीखोर वागणूक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरत आहे. यासंदर्भात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड यांच्यासह लाला मावस्कर मोतीराम मावस्कर, ठुनू धिकार, चिताराम मावस्कर, लाला काकडे, लच्छू कासदेकर, रामाजी बेलकर अनिल सराटे अशा जवळपास अडीचशे पेक्षा अधिक गावकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन खा. राणा यांना देण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक