शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

ड्रोन कॅमेऱ्याने जंगलातील खोऱ्यांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:00 AM

सेमाडोह ते रायपूर मार्गातील चिकलाम फाटा ते चिकलाम व्याघ्र संरक्षण कुटी यादरम्यान गस्तीच्या पहिल्या टप्यात रायपूर परिक्षेत्रात पाहणी केली गेली. चिकलाम ते कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटीदरम्यान गस्तीच्या दुसऱ्या टप्यात माखला व लगतच्या परिसरात आगीबाबत निरीक्षण केले गेले. या निरीक्षणात त्या खोऱ्यात कुठेही आग दिसून आली नाही.

ठळक मुद्देदोन टप्प्यांत गस्त : मेळघाट वनक्षेत्रात तीन उपवनसंरक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात तीन उपवनसंरक्षकांनी १ मे रोजी सामूहिक गस्त घातली. या आंतरविभागीय गस्तीदरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने जंगलातील संपूर्ण खोऱ्यांची पाहणीही केली गेली.बुद्ध पौर्णिमेला होऊ घातलेल्या वन्यप्राणी गणनेसाठी तयार करण्यात आलेल्या मचानी, जंगलातील पाणवठे, वन्यप्राण्यांसाठी टाकले गेलेले चाटण, लोटण आणि आगीबाबतचे निरीक्षणही सामूहिक गस्तीदरम्यान उपस्थित वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले.मेळघाट वन्यजीव विभागातील घटांग परिक्षेत्रातील १४ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह-रायपूर वनक्षेत्रात गस्त करीत वनसंवर्धनासाठी आवश्यक बाबींची माहिती घेतली. सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवाबाला एस., मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक इंद्रजित निकम व कमलेश पाटील यांच्यासह सेमाडोह, रायपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी या आंतरविभागीय सामूहिक गस्त मोहिमेत सहभागी झाले होते.सेमाडोह ते रायपूर मार्गातील चिकलाम फाटा ते चिकलाम व्याघ्र संरक्षण कुटी यादरम्यान गस्तीच्या पहिल्या टप्यात रायपूर परिक्षेत्रात पाहणी केली गेली. चिकलाम ते कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटीदरम्यान गस्तीच्या दुसऱ्या टप्यात माखला व लगतच्या परिसरात आगीबाबत निरीक्षण केले गेले. या निरीक्षणात त्या खोऱ्यात कुठेही आग दिसून आली नाही.दरवर्षी उन्हाळ्यात मेळघाटच्या जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. त्या कधी नैसर्गिक असतात, तर कधी जंगलात शिरणाऱ्या मनुष्याच्या चुकीने वा हेतुपुरस्सर आगी लागतात. त्यांच्या नियंत्रणाबाबत सजग राहण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. यादरम्यान कारागोलाईत उपस्थित कर्मचाऱ्यांनी ड्रोन कॅमेरा वापरू न संपूर्ण खोऱ्याची पाहणी केली. ड्रोन कॅमेरा चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. गस्तीदरम्यान मास्क वापरले गेले. हात धुतले गेले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले गेले.आंतरविभागीय सामूहिक गस्त १ मे रोजी पार पडली. वनगुन्हे रोखण्यासह वनवणव्याच्या हंगामात आंतर विभागीय समन्वय ठेवण्याकरिता हा उपक्रम उपयुक्त ठरला.- डॉ. शिवाबाला एस.उपवनसंरक्षकसिपना वन्यजीव विभाग परतवाडा

टॅग्स :forestजंगल