शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

दुष्काळी ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटींची मागणी, आठ लाख शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 5:23 PM

आठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

ठळक मुद्देआठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

अमरावती : मागील वर्षी कमी पैसेवारीमुळे दुष्काळस्थिती जाहीर झालेल्या मदतीपासून वंचित ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटी ३ लाख ४३ हजार रुपयांची मागणी गुरुवारी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे केली. पश्चिम विदर्भात जिरायती व बागायती अशा ७ लाख ८९ हजार ७०५ शेतकऱ्यांना बाधित १० लाख २७ हजार ६३७ हेक्टरसाठी सदर मागणी करण्यात आलेली आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार विभागातील २४ तालुक्यांना कमी पावसाचा ट्रिगर लागू झाल्याने निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला व याच तालुक्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती शेतीसाठी ६,८०० रुपये प्रतिहेक्टर व बागायती शेतीसाठी १८,००० रुपये या निकषाप्रमाणे मदत देण्यात आली.

शासनाने ८ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा पावसाचा खंड या निर्देशांकान्वये अमरावती विभागातील ४७ महसूल मंडळात दुष्काळस्थिती जाहीर केली व या गावांना दुष्काळाच्या आठ सवलती जाहीर केल्यात. मात्र, मदतनिधी दिला नव्हता. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पत्राद्वारे ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्ष्काळाच्या सवलती जाहीर केल्या. मात्र, ही सर्व गावे मदतनिधीपासून वंचित राहिली. त्यामुळे २९ जून २०१९ च्या पत्रान्वये महसूल विभागाच्या उपसचिवांनी दुष्काळ मदत निधीपासून वंचित गावांसाठी आवश्यक निधीच्या मागणीचे पत्र विभागीय आयुक्तांना पत्र दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी २५ जुलै रोजी ७४१ कोटींची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना गतवर्षीचा दुष्काळनिधी मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बागायती क्षेत्रासाठी हवेत ६७.८८ कोटीपश्चिम विदर्भात ३२ हजार २६७ शेतकºयांच्या बागायती ३७ हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांप्रमाणे ६७.८८ कोटींची मागणी करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्याला ४६.५५ कोटी, अकोला जिल्ह्यात ११.२१ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६.९४ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात २.९६ कोटी, तर वाशीम जिल्ह्यात १९.९८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. दोन हेक्टर मर्यादेतच ही मदत मिळणार आहे.बॉक्स

जिरायती शेतीसाठी जिल्हानिहाय मागणी (कोटी)जिल्हा         गावे    शेतकरी    क्षेत्र    मदतअमरावती    १०५७    २६८०८६    ३७३७२३    २५४.१३अकोला     २६१    ७६४२१    ९७८९९    ६६.५७यवतमाळ    १४८४    १८८३१०    ३०२०१९    २०५.३७बुलडाणा    ५८६    २१२६८९    २००२७२    १३६.१८वाशीम    ३९    ११९३२    १६००८    १०.८८एकूण        ३४२७    ७५७४३८    ९८९९२१    ६७३.१४ 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊस