भंडारा : वेळेत निवडणुका न घेतल्याचे कारण समोर करून राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जिल्हा निबंधकांना प्रशासकपदी नियुक्त केले होते. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने निर्वाळा देत विद्यमान संचालक मंडळाला कायम राहण्याचा निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दरम्यान, सर्वोच्च न्याायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत विद्यमान संचालक मंडळ कायम राहील, असा निर्वाळा दिल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे.जिल्हा मध्यावर्ती बँकेने निवडणुका लावल्या नाही म्हणून शासनाने या बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती. त्या आदेशाला वर्तमान संचालक मंडळाने याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जुने संचालक मंडळ कार्यान्वित झाले. या आदेशाला कृष्णा अतकरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. ७ एप्रिलला झालेल्या सुनावणीनुसार सर्वोच्च न्ययालयाने अतकरी यांची अपिल खारीज केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. बँकेच्यावतीने अॅड.अजय घारे यांनी काम पाहिले. (जिल्हा प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाचा जिल्हा बँकेला दिलासा
By admin | Published: April 09, 2017 12:24 AM