शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मद्यधुंद कारचालकाचा बेदरकारपणा

By admin | Published: February 15, 2016 12:34 AM

अपूर्वा देऊळगावकरच्या मृत्यूची शाई वाळते न वाळतेच रविवारी पुन्हा एका वाहनचालकाचा बेदरकारपणा अमरावतीकरांना अनुभवायला मिळाला.

चारचाकी पार्किंगमध्ये शिरली : प्रकरण दडपण्याचा प्रयत्नअमरावती : अपूर्वा देऊळगावकरच्या मृत्यूची शाई वाळते न वाळतेच रविवारी पुन्हा एका वाहनचालकाचा बेदरकारपणा अमरावतीकरांना अनुभवायला मिळाला. या मद्यधुंद वाहनचालकाने आपले चारचाकी वाहन थेट दुचाकीच्या पार्किंगमध्ये घातले. या अपघातात चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. दुचाकींमुळे समोरील दुकानाचे मोठे नुकसान टळले. चारचाकी वाहनाचा अग्रभाग चकनाचुर झाला. रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास इर्वीन चौकातील हॉटेलला लागून असलेल्या एका फ्लावर शापीसमोर हा अपघात घडला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आशिष बळीराम लुल्ला (३८, रा. लुल्ला लाईन, रामपुरी कॅम्प) या चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान झालेले नुकसान भरुन देण्यासाठी आम्ही तयार आहोत.पोलीस कर्मचाऱ्याची शिष्टाईअमरावती : गुन्हे दाखल न करता सोडून द्या, अशी विनंती करण्यसाठी एका बड्या विधिज्ञासह समाजबांधव धावले. सुमारे तासभर तक्रारकर्त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेतला. तक्रार केल्यास नुकसान भरपाई मिळेलच असे नाही, त्यामुळे तक्रार न करता नुकसानभरपाई घेऊन घ्या, असा अनाहुत सल्ला त्या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारकर्त्या तरुणाला दिला. ही शिष्टाई सुरू असतानाच पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा यांनी आशिष लुल्ला याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. वृत्त लिहेस्तोवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु होती. तरुण पोहोचले ठाण्यातआशिष लुल्ला हा एम.एच.२७/बीई-२३७४ या चारचाकी वाहनाने इर्विन चौकाकडून मोर्शी रोडवर येत असताना ही चारचाकी हॉटेलला लागून असलेल्या फ्लॉवर शॉपीसमोर असलेल्या दुचाकींच्या पार्किंग स्थळी शिरली. यात पठाण चौकातील अब्दुल कलीम अ. सलीम यांची एम.एच.२७/एझेड ९९३१ या दुचाकीसह अन्य ४ दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अ. कलीम यांच्यासह अन्य दुचाकीचा एकही शहर कोतवालीत तक्रार करण्यासाठी पोहोचले. मोठा अनर्थ टळलाही कार भरधाव वेगात दुचाकीच्या पार्किंगवर आदळली. दुचाकी आडव्या असल्यानेच फुलाच्या दुकानाचे संभाव्य नुकसान टळले. या ठिकाणी दुचाकीची रांग नसती तर ही भरधाव कार त्या दुकानात शिरुन वित्तहानीसह प्राणहाणीची शक्यता नाकारता येत नव्हती. विशेष म्हणजे कारमधून उतरुन आशिष लुल्ला याने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र काही प्रत्यक्षदर्र्शींनी त्याचा पाठलाग करुन त्याला आयटीआयच्या बोळीमध्ये पकडले.