लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : दोन दिवसांपासून तालुक्यात कडाक्याची थंडी असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशी, तूर, हरभरा, गहू तसेच रबी पिके करपली. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदतीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली.आठ दिवसांपासून तालुक्यात कडाक्याची थंडी पडल्याने शीतलहर निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. तूर, हरभरा, गहू, वांगी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. घोराड परिसरातील गोपाल भाकरे आणि श्रीराम भाकरे यांच्या शेतातील हे पीक दवामुळे करपले आहे. याबाबत महसूल विभागाला लेखी तक्रार देऊन आर्थिक मदतीची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली. दवामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची देवेंद्र भुयार यांनी पाहणी केली. त्यात थंडीचा प्रकोप झाल्यामुळे आदीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी भुयार यांनी केली आहे.
दव गोठल्याने पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:00 PM
दोन दिवसांपासून तालुक्यात कडाक्याची थंडी असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशी, तूर, हरभरा, गहू तसेच रबी पिके करपली. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदतीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली.
ठळक मुद्देवरूड तालुका : शेकडो हेक्टरमधील पिके बाधित