शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘ड्राय झोन’मध्ये अडीच हजार अवैध बोअरने उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:47 PM

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देसंत्राबागा वाचविण्याचा आटापिटा : बहुतांश निकामी, दलालांचा सुळसुळाट

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.अवैध बोअरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, महसूल विभागाचे मौन दलालांच्या घुसखोरीला हितकारी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटली आहे. महसूल व पोलीस यंत्रणेशी असलेल्या आर्थिक संगनमतामुळे बोअरची संख्या वाढली असताना, अवैध पाणी उपशाने भूगर्भाची चाळण झाली आहे.तालुक्यात नऊ सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांत केवळ पाच ते दहा टक्के जलसाठा आहे, तर जुन्या बोअर कोरड्या पडल्या आहेत. केवळ संत्रा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी ४० ते ५० हजार रुपये ‘आॅन’ देऊन बोअर केले. बोअरला पाणी लागले म्हणून आनंद झाला; परंतु आठवड्यात बोअर कोरडे पडल्या. लाखो रुपयांचा चुराडा झाल्याने संत्रा जगवावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तालुक्यात अडीच हजारांपेक्षा अधिक नवीन, मात्र अवैध बोअर करण्यात आले. त्यातील केवळ २५ टक्के बोअरलाच पाणी लागले. ७५ टक्के बोअरचा खर्च पाण्यात गेला. संत्र्यासह गहू, चणा, मक्का, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके तालुक्यात घेतली जातात. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे संत्र्याला आवश्यक असलेल्या वेळेत पुरेसे पाणी मिळत नाही. तालुक्यातील भूजलपातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले, तर विहिरींची पातळी ६० ते ८० फुटांवर गेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन बोअर करून देणारे दलाल तालुक्यात सक्रिय झाले आहेत.महसूल विभाग बनला धृतराष्ट्रतालुक्यातील अनेक गावांतील बसथांब्यावर बोअर करून देणारे दलाल दिसून येतात. मात्र, महसूल विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यास प्रतिबोअर मलिदा पोहोचविला जात असल्याने त्यांनी या बेकायदा बोअरकडे दुर्लक्ष चालविले आहे. महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बोअर होत असताना, केवळ पैशांच्या मोहापायी तालुक्यातील भूगर्भाची चाळण केली जात आहे.‘ड्राय झोन’मध्ये बोअर होतातच कशा?सन २०१३ पासून तालुका ड्राय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, भूगर्भाची पातळी अधिक खोल गेल्याने बोअर खोदकामावर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे येथील संत्राउत्पादक गरज म्हणून बोअर करीत असेल तरी महसूलने त्याकडे का कानाडोळा चालवलाय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.