शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एक लाख हेक्टर बाधित उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 10:05 PM

यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना अहवाल : नांदगाव, दर्यापुरात ८० टक्क्यांवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश गुरुवारी जिल्ह्यधिकाऱ्यांनी सर्व तालुका यंत्रणांना दिलेत व दोन दिवसांत अहवाल मागविला. प्राथमिक अहवालापेक्षा जास्त प्रत्यक्ष नुकसान असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या पत्राच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना कपाशीचे पंचनामे करण्याचे आदेश गुरुवारी दिले होते.बाधित तालुक्यातील सरासरी नुकसानबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात हेक्टरी ८४९ किलो रुईचे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट होणार आहे. यामध्ये सर्वाधिक दर्यापूर तालुक्यात ८० टक्के, नांदगाव खंडेश्वर ७८, अमरावती, चांदूर बाजार, भातकुली, अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा तालुक्यात ५०, चांदूर रेल्वे २५, धामणगाव रेल्वे ६०, मोर्शी ५५, वरूड १०, तिवसा ४० व अचलपूर तालुक्यात ६० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रुईचे उत्पादन हेक्टरी ८४९ किलोने कमीबोंड अळीमुळे हेक्टरी ८४९ किलो रुईचे उत्पादन कमी होणार आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात सर्वाधिक १,०५६ किलो, अमरावती ८४३, चांदूर रेल्वे ८३५, धामणगाव रेल्वे ७२२, नांदगाव खंडेश्वर ८४४, मोर्शी ८८१, वरूड ८१०, चांदूर बाजार ९४१, तिवसा ९३७, अचलपूर ९५०, अंजनगाव सुर्जी ९२१, दर्यापूर ९१४, धारणी ४७२ व चिखलदरा तालुक्यात ५२५ किलो रुईच्या उत्पादनात घट येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

टॅग्स :cottonकापूस