शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

डीएफओंच्या कारवायांमुळे आरागिरणी मालक धास्तावले

By admin | Published: November 04, 2016 12:42 AM

येथील उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मागील महिन्यात पोहरा जंगलात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून अवैध चराईवर अंकुश आणला.

‘लक्ष्मी’ परत : आडजात लाकूड कटाई गुंडाळलीअमरावती : येथील उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मागील महिन्यात पोहरा जंगलात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून अवैध चराईवर अंकुश आणला. अंजनगाव सुर्जी, परतवाडा येथील आरागिरण्यांवर धाडसत्र टाकून गुन्हे दाखल केले. डीएफओंनी सुरु केलेल्या याधाडसी कारवायांमुळे जिल्ह्यातील आरागिरणी मालक धास्तावले आहेत. आडजात लाकूड कापण्याची मूक परवानगी मिळण्यापूर्वीच बोलणी फिस्कटल्याची माहिती आहे.दरवर्षी दिवाळी आटोपताच जिल्ह्यातील आरागिरणी मालक आडजात लाकूड कटाईच्या परवानगीसाठी असोसिएशनच्या माध्यमातून ‘लक्ष्मी’ गोळा करतात. आरागिरणी मालकांचा हा जुना शिरस्ता आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी अमरावतीत उपवनसंरक्षकपदी रुजू झालेले हेमंत मीना यांनी वनविभागात अवैध कारभाराला लगाम बसविण्याचा चंग बांधला आहे. अतिक्रमणमुक्त जंगल कसे करता येईल, याचे नियोजन हेमंत मीना यांनी चालविले आहे. उपवनसंरक्षकांच्या धाडसी कारवायांमुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘सौदे’ फिस्कटत आहेत. तसेच उपवनसंरक्षकांनी आस्कमिक भेटी, धाडसत्र आरंभल्याने कनिष्ठ वनाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. दिवाळीपूर्वी पोहरा, चिरोडी जंगल उपवनसंरक्षक मीना यांनी दुचाकीवर फिरून पिंजून काढले होते, हे विशेष. थेट दुचाकीने जंगलात गस्त घालून कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा जाणून घेणारे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्या कार्यशैलीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद संचारला आहे.