लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीत शिरजगाव कसबा व करजगाव मंडळांतील घरांची पडझड झाली. त्याचसोबत देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीके खरडून गेली.देऊरवाडा परिसरातील बगाडी व चारघड नाल्याच्या पुराचे पाणी २० एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या २० एकरांपैकी १५ एकर पिकाखालील क्षेत्राला पुरामुळे हानी पोहचली आहे. यात १४ एकर कपाशी व एक एकर हळद पिकाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या या महापुराचा ११ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.या सर्व शेतकऱ्यांची शेती मौजा पांढरी व देऊरवाडा परिसरात आहे. पैकी ६ शेतकऱ्यांची शेती देऊरवाड्याजवळील वडूरा येथे तर उर्वरीत ५ शेतकऱ्यांची शेती देऊरवाडा येथे आहे. यात बगाडी नाल्याच्या पुरामुळे पाच शेतकºयांचे पिकाचे नुकसान झाले आहे. यापैकी पंजाब माहुरे यांच्या एक एकर क्षेत्रातील हळद पीक खरडून गेले आहे तर महादेव दातीर कापूर एक एकर, राजू सिनकर दोन एकर, श्याम सोनार एक एकर, सागर केदार दीड एकर क्षेत्रावरील कपाशीचे पीक खरडून गेले तर केदार यांच्या शेतातील घरात साठवून ठेवलेला ४० क्विंटल कांदाही पुरामुळे वाहून गेला आहे.तसेच याच परिसरातील चारगड नाल्याच्या पुरामुळे साडेनऊ एकरातील कपाशीचे खरडून गेले. यात मौजा वडूरा भागातील अ. रहेमान शे. रयमतुल्ला यांचे ३ एकर, शे. गफुर शे. मुनिर २ एकर, नझीर खाँ काले खाँ यांचे ४ एकर पैकी एक एकर शेत, प्रमोद वानखडे अर्धा एकर, गोपाल माहुरे २ एकर, किशोर माहुरे एक एकर, याप्रमाणे कपाशीचे शेत पुरामुळे खरडून गेले आहे. शेतातील उभे पीक खरडून गेल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. प्रशासनाकडून आर्थिक मदत येईल काय, याकडे डोळे लावून बसले आहे.अतिवृष्टीमुळे नुकसानीचा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे. सद्या शेतीच्या नुकसानाचे सर्वेक्षण सुरू आहे. अहवाल प्राप्त होताच झालेल्या नुकसानाची माहीती शासनाकडे पाठवून शेतकºयांसाठी मदतीच्या निधीची मागणी नोंदविण्यात येईल.- शिल्पा बोबडे,तहसीलदार, चांदूरबाजार
नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:29 AM
तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीत शिरजगाव कसबा व करजगाव मंडळांतील घरांची पडझड झाली. त्याचसोबत देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीके खरडून गेली.
ठळक मुद्दे११ शेतकऱ्यांना फटका : १४ एकर कपाशी, एक एकरातील हळदीचे नुकसान