लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील साद्राबाडी येथे सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने भीतीपोटी नागरिक नातेवाईकांकडे गेल्याने गाव ओस पडले आहे. गावात घरांची राखण करण्यासाठी प्रत्येकी एक व्यक्ती थांबली असून, सायंकाळी गावाबाहेर व सकाळी पुन्हा गावात, अशी बहुतांश कुटुंबांची दैनंदिनी झाली आहे.२२ आॅगस्टला दुपारी ४ नंतर धरणीकंप झाला. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक मोठा हादरा बसला. त्यानंतर २.३० च्या सुमारास पाच जबर हादरे बसले. गुरुवारी पहाटे ५.३० वाजता सौम्य हादरे बसले. त्यानंतर सकाळी ७ वाजता पुन्हा जबर हादरा बसला. नंतर सकाळी १०.२१ ते १०.५८ पर्यंत पाच जबर हादरे बसले. धरणी कंपाचे हे सत्र सतत सुरू असल्याने नागरिकांनी बुधवारीच महिला व मुलांना नातेवाईकांच्या घरी पोहचविले. त्यामुळे परिसरातील गावे ओस पडली आहेत. नागरिकांच्या मनातून भूकंपाची भीती कमी झालेली नाही. जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
सूनबाई गेल्या माहेरीगावात लग्न होऊन आलेल्या नवीन सूनेला तिच्या माहेरचे लोक मंडळी भूकंपाच्या वार्तेने घेऊन गेले आहेत. गावातील ५० टक्के महिला व मुले गाव सोडून गेले आहेत.
आपत्ती निवारण पथक पोहोचलेअमरावतीहून धारणीमार्गे लगतच्या साद्राबाडीसह लगतच्या गोलांडोह गावात आपत्ती निवारण पथक दाखल झाले. पथकात १० जवानांचा समावेश आहे. गुरुवारी पथकाने आजूबाजूच्या गावांना भेटी देऊन लोकांना धीर दिला.भाजपकडून मदतीचा हातभारतीय जनता पक्षातर्फे रेस्क्यू पथक आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद शाळेत नाश्ता आणि जेवण घेऊन आले.