नोटाही खाक : महसूल विभागाकडून पंचनामा दर्यापूर : सांगवा बु। येथे शनिवारी लागलेल्या आगीत दोन घरे पूर्णत: तर एक घर अंशत: जळाले. ही घटना लक्षात येताच परिसरातील सिलेंडरच्या स्फोटाच्या भीतीने नागरिकांनी चक्क घरातील सिलेंडर बाहेर आणून नालीत टाकले. त्यामुळे अनर्थ टळला. शनिवारी व रविवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. या आगीत ज्या नागरिकांचे घरे जळाली आहे. यामध्ये रंगराव सगणे यांच्या घराला आग लागून ८० हजारांच्या नवीन नोटा जळून खाक झाल्या. त्यांना प्रशासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी केली आहे. प्राथमिक अहवाल महसूल विभागाला सादर दर्यापूर : रामराव सगणे यांचोही घर जळून खाक झाले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने चार घरांवरील मोठे संकट टळले. उपविभागीत अधिकारी विजय राठोड यांनी सांगवा येथे भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली. लाभार्थ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आ.रमेश बुंदिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आगीत भस्म झालेल्या घरांची नुकसानीचे सर्वे करून जिल्हा परिषद अभियंत्याच्या माध्यमातून त्याचे मूल्यांकन काढण्यात येईल व तो अहवाल महसूल विभागाला सादर झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रक्रिया होईल. सांगवा येथील तलाठी गवई यांनी नुकसान संदर्भातील प्राथमिक अहवाल महसूल विभागाला सादर केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्फोटाच्या भीतीने सिलेंडर टाकले नालीत
By admin | Published: April 24, 2017 12:44 AM