शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

यशोमतींच्या पाठपुराव्यामुळे उलगडले माधुरीच्या खुनाचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:17 AM

दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला.

ठळक मुद्देसीपींची गंभीर दखल : पोचगे कुटुंबाला मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला.यशोमती ठाकूर यांनी माधुरीच्या कुटुंबीयांसह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. यावेळी चर्चेदरम्यान प्रकरण विधिमंडळात लावून धरु, असा गर्भीत इशारा पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यामुळेच पोलिसांनी तपास कार्याला गती देत माधुरीची हत्या करणाºयांना गजाआड केले.तिवसा तालुक्यातील रहिवासी माधुरी अमरावतीत शिक्षण घेत असताना अमित अकाशे याने प्रेमजाळ्यात अडकविले. तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर तिचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलीस खात्यातील आकाशे बंधूंसह सहकारी आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. मृत तरुणीचे आई-वडील व गावकरी आ. यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघातील आहेत.घटनास्थळी मिळाले अवशेषअमरावती : माधुरी ही १० महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांना मिळाली. यासंदर्भात आगस्ट २०१७ ला यशोमती ठाकूर यांनी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षकांना विचारणा केली. त्यानंतर मुलीच्या वडील व भावाने तक्रार नोंदविली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी दुर्लक्ष केले. ही बाब पोलीस आयुक्तांनीसुद्धा मान्य केली आहे. अखेर हवालदील झालेल्या मुलीच्या आई वडिलांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. १६ एप्रिल रोजी यशोमती ठाकूर यांनी मुलीच्या आईवडिलांना सोबत घेऊन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पत्र दिले व तारांकित प्रश्न येत्या अधिवेशनात उचलणार असल्याचे सांगितले. यावर पोलीस आयुक्तांनी तत्काळ दखल घेत गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक व सायबर सेल यांना दालनात बोलवून हे प्रकरण लवकरच उजागर करायला लावले. त्यामुळे सदर तरुणीच्या खुनाचे रहस्य पोलिसांनी उलगडले. सदर कुटुंबीयांना न्याय मिळाला. माधुरी पोचगे हिचा मृतदेह अचलपूर तालुक्यातील एका शेतशिवारात असणाºया विहिरीत जाळण्यात आला. मंगळवारी गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुन्हा तपासणी केली असता, विहिरीत काही अवशेष मिळाले. ते माधुरीचेच आहे किंवा नाही, ही बाब डीएनए तपासणीनंतर उघड होईल, ते अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविले जाणार आहे.चारही आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडीमाधुरी पोचगे हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी अमित सोमेश्वर अकाशे, मोहित अकाशे (दोन्ही रा.सुलतानपुरा, अचलपूर), अनूप पुरुषोत्तम हिरुळकर (२५,रा.अचलपूर) व शेतमालक नितीन प्रल्हाद श्रीराव या चौघांना अटक केली. अमित, मोहित व अनूप या तिघांना न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. शेतमालक नितीन श्रीरावला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. या चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना २७ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर