अमरावती : सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.तालुक्यातून जाणाºया अप्पर वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी गुरुकुंज मोझरी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. तथापि, या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी, अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यांच्या या मागणीची फलश्रुती म्हणून तत्कालीन शासनाने गुरुकुंज उपसा सिंचन योजनेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) यांच्यामार्फत १३ जुलै २००९ नुसार प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत उजव्या मुख्य कालव्यावरून पाण्याची उचल करून तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. भूसंपादन व नलिका वाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे.
गुरुकुंज उपसा सिंचनमुळे २२ गावांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:20 PM
सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार सिंचनाची सुविधा